Shoulder Bag Or Backpack Which Is Better For Work : ऑफिसला जाताना कोणती बॅग घेऊन जायची हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो. त्यातच ही बॅग स्टायलिश, आरामदायी आणि ऑफिसला घेऊन जाणाऱ्या सगळ्याच वस्तू त्यात व्यवस्थित राहाव्यात, अशीही आपली अपेक्षा असते. त्यामुळे खांद्याला अडकवायची बॅग की पाठीवरची बॅग (बॅकपॅक) नक्की कशाची निवड करावी यामध्ये आपला गोंधळ होतो. तर आज आपण त्याचबद्दल या बातमीतून जाणून घेणार आहोत…

अनेकदा एका पट्ट्याच्या, खांद्याला अडकवायच्या लॅपटॉप बॅग तुम्हाला फॅशनेबल लूक देऊन जातात. पण, कालांतराने स्नायूंवर याचा ताण येऊ शकतो आणि मान, पाठ व खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात. त्याशिवाय या बॅगांची क्षमता कमी असते. तुम्ही जास्त सामान या बॅगेतून घेऊन जाऊ शकत नाही. याउलट बॅकपॅक खांद्यावर समान प्रमाणात वजन वितरित करते. तुमच्या शरीरावरचा ताण कमी करते आणि शरीर स्थितीत राहण्यास प्रोत्साहन देते, असे गाझियाबादच्या वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंटचे असोसिएट डायरेक्टर डॉक्टर अखिलेश यादव म्हणाले आहेत.

याबद्दल गुरुग्राम येथील नारायण हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर युगल कारखुर यांनी सहमती दर्शविली आणि सांगितले की, खांद्याला अडकवायची बॅग आणि बॅकपॅक यांची तुलना केली, तर खांद्यांचे आरोग्य आणि आरामासाठी बॅकपॅक अधिक फायदेशीर ठरते. खांद्याला अडकवायची बॅग असमान भार, अस्वस्थता निर्माण करते आणि त्यामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात; जसे की खराब पोश्चर आणि स्नायूंचे असंतुलन. बॅकपॅक दोन्ही खांद्यांवर वजन समान रीतीने सांभाळते; ज्यामुळे स्नायूंवर येणारा ताण आणि खांद्याला होणाऱ्या वेदना कमी होतात.

याव्यतिरिक्त बॅकपॅकमध्ये अनेक कप्पे असतात, ज्यामुळे जास्त सामान घेऊन जाणे आणि सामान व्यवस्थित राहील याची खात्रीसुद्धा राहते. बॅगेची शैली काहीही असो; खांद्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुमच्या पोश्चरकडे लक्ष देणे, बॅगेत वजन कमी ठेवणे आणि बॅगेचा पट्टा योग्यरीत्या समायोजित करणे आवश्यक आहे, असे डॉक्टर यादव म्हणाले आहेत.

मॉडर्न बॅकपॅक (पाठीवर लावायच्या बॅग) बहुतेकदा एर्गोनॉमिक्स म्हणजे आरोग्याचा विचार करून डिझाइन केलेल्या असत, ज्यामध्ये पॅडेड स्ट्रॅप्स (मऊ गादीवर पट्टे), लंबर सपोर्ट (पाठीच्या खालच्या भागाला आधार देणारी रचना), ब्रेथेबल फॅब्रिक आदींचा सामावेश असतो. त्यामुळे बॅकपॅक दीर्घकाळ वापरताना शरीराला आराम देते. खांद्याला लावली जाणारी बॅग स्टायलिश आणि हलक्या भारांसाठी सोईस्कर असते; पण बहुतेकदा आरोग्याचा विचार करून तयार केलेल्या नसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टर युगल कारखुर यांच्या मते, खांद्याची बॅग तुमच्या हालचालींवर मर्यादा घालते, चालताना असंतुलन निर्माण करू शकते. तर दुसरीकडे बॅकपॅक नैसर्गिक आणि संतुलित हालचाल करण्यास अनुमती देते; ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी किंवा जास्त वर्ष वापरण्यासाठी सोईस्कर बनतात. पण, तरीही कोणताही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या मागण्या आणि वैयक्तिक आवडी-निवडींचादेखील विचार केला पाहिजे.