धुम्रपान करत असाल तर या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. कारण धुम्रपानामुळे तुमच्या जनुकांमध्ये मोठ्याप्रणाणावर बदल घडून कर्करोग आणि मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे एका नव्या संशोधनाने सिध्द केले आहे.
उप्पसाला विद्यापीठ आणि उप्पसाला वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, धुम्रपानामुळे तुमच्या शरिरातील जनुकांमध्ये वेगाने बदल होतो. जनुकांमधील या बदलांमुळे कर्करोग व मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. परिणामी, रोगप्रतिकारक्षमता मंदावून शुक्रजंतू कमजोर होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
या संशोधकांनी धुम्रपान करणाऱ्या व तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींवर संशोधन केले. तंबाखू चघळण्याचा जनुकांवर सरळ आघात होत नसल्याचे या संशोधकांनी अहवालामध्ये नमुद केले आहे. मात्र, तंबाखूच्या ज्वलनामुळे अनेक नवे घटक तयार होवून त्यांचा सरळ परिणाम धुम्रपान करणाऱ्यांच्या जनुकांवर होत असल्याचे जनुक तज्ज्ञ व या संशोधनातील प्रमुख शास्त्रज्ञ एसा जॉन्सन यांनी सांगितले.
धुम्रपानाचा वाईट परिणाम मानसाच्या पुढील पिढ्यांना भोगावा लागणार असल्याचे या संशोधकांनी नमुद केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
धुम्रपानामुळे होतो जनुकांमध्ये बदल
धुम्रपान करत असाल तर या बाबीकडे दुर्लक्ष करू नका. कारण धुम्रपानामुळे तुमच्या जनुकांमध्ये मोठ्याप्रणाणावर बदल घडून कर्करोग

First published on: 19-12-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smoking can alter your genes