४ डिसेंबर २०२१ रोजी या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. या दिवशी शनि अमावास्याही आहे. शनिवारी असलेलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. अंटार्क्टिका, दक्षिण अफ्रिका, अटलांटिकचा दक्षिणेकडील भाग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिकेत दिसेल. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे इथे सुतक काळ वैध राहणार नाही. तसं पाहिलं तर सूर्यग्रहणाचा सुतक काळ ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. या काळात अनेक कामे करण्यास मनाई असते. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण शुभ मानले जात नाही. पंचांगानुसार ग्रहण काळात सर्व १२ राशींवर प्रभाव पडेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण आणि शनि अमावास्या दरम्यान काही उपाय केल्यास ग्रहांना अनुकूल केलं जाऊ शकतं.

ग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३.०७ वाजता संपेल. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला ग्रहण होणार आहे. ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि बुध वृश्चिक राशीत असतील. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल जे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा त्याच्या मागे सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकतो. पंचागानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ३ डिसेंबर रोजी दुपारी ४.५५ पासून सुरू होऊन शनिवार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १.१२ पर्यंत आहे. अशा स्थितीत शनिश्चरी अमावस्या उदयतिथीमुळे ४ डिसेंबर रोजी मान्य आहे. सूर्यग्रहण आणि शनि अमावस्येच्या काळात धनलाभासाठी धान्य, शत्रूंच्या अंतासाठी काळे तीळ, आपत्तीपासून संरक्षणासाठी छत्री आणि शनीच्या प्रभावापासून मुक्तीसाठी मोहरीचे तेल दान करावे.

Vinayak Chaturthi 2021: या वर्षातील शेवटची अंगारक विनायक चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

असा करा पूजाविधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • शनि अमावस्येला स्नान शनिदेवाची विधिवत पूजा करावी.
  • मोहरीचे तेल आणि काळे तीळ घालून शनिदेवाचा अभिषेक करावा.
  • शनी मंदिरात जाऊन शनिदोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करा.
  • शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्या आणि ग्रहणाच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करा.
  • ग्रहण संपल्यानंतर संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावावा.
  • शनि मंदिरात जाऊन मंदिराची स्वच्छता करा आणि शनिदेवाला निळी फुले अर्पण करा.
  • शिव सहस्रनामाचा पाठ करा, यामुळे शनीच्या प्रकोपाचे भय नाहीसे होते आणि सर्व अडथळे दूर होतात.

येथे दिसणार सूर्यग्रहण

सूर्यग्रहण शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे, जे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सुतकांचे नियम जरी ग्रहणात ग्राह्य ठरणार नसले तरी सूर्यग्रहणाचा काही परिणाम नक्कीच होईल.