Natural Drinks for Kidney Health: किडनी हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव असून, तो शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि आरोग्य टिकवण्यात मुख्य भूमिका बजावतो. रक्तातून विषाक्त घटक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम हा अवयव करतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि खनिजांचं संतुलन राखलं जातं. त्याशिवाय लाल रक्तपेशींच्या निर्मितीतही किडनीचा हात असतो. त्यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक संशोधनानुसार, पुरेसं पाणी आणि योग्य प्रमाणातील तरल पदार्थ न घेतल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येतो. दीर्घकाळ असं होत राहिलं, तर किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा गंभीर किडनी रोग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया व कॅनडा येथील संशोधक म्हणतात की, शरीराला पुरेसं हायड्रेट केलं, तर किडनी सोडियम, युरिया व इतर टॉक्सिन्स सहज बाहेर काढते, ज्यामुळे क्रॉनिक किडनी रोगाचा धोका कमी होतो.
PubMed Central वर २०१३ मध्ये इराणी डॉक्टर व वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, डिहायड्रेशन दूर करण्यासाठी पाणी सर्वांत प्रभावी असते. पाण्याचे तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस (सुमारे ६० अंश फॅरेनहाइट) असावे. हे सहज समजून घेण्यासाठी आपण टाकीतील थंड पाणी किंवा सामान्य पाणी याचा उल्लेख करू शकतो. पाणी हा सर्वांत प्रभावी तरल पदार्थ आहे; पण त्याशिवाय काही नैसर्गिक ड्रिंक्स किडनीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
किडनीसाठी उपयुक्त नैसर्गिक पेय
१. लिंबूपाणी आणि सायट्रस ड्रिंक्स (लिंबूवर्गीय फळं)
लिंबूपाणी शरीराला ताजेतवाने ठेवते. त्यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड (Citric Acid) मूत्रमार्गातील कॅल्शियमचे स्फटिक एकत्र होऊन, स्टोन तयार होण्याला प्रतिबंध करते. थंड किंवा स्पार्कलिंग पाण्यात लिंबू किंवा लिंबोळा (लाइम) मिसळून पिणे फायदेशीर ठरते. मात्र, त्यात साखर टाळणे आवश्यक आहे.
२. शुगर-फ्री क्रॅनबेरी ज्यूस
क्रॅनबेरी ज्यूस मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) टाळण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे जीवाणू मूत्रमार्गाच्या भिंतीला चिकटू शकत नाहीत आणि किडनीपर्यंत पोहोचण्यापासून थांबवले जातात. १०० टक्के शुद्ध आणि साखरविरहित ज्यूस घेतल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.
३. हर्बल आणि ग्रीन टी
पेपरमिंट, हिबिस्कस, अदरक, कॅमोमाईल यांसारख्या हर्बल टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि हलके मूत्रवर्धक गुण असतात, जे किडनीतील अशुद्धता बाहेर टाकण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये असलेले EGCG अँटीऑक्सिडंट्स किडनी स्टोन होण्याचा धोका कमी करतात आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरतात.
४. वनस्पतीजन्य दूध (प्लांट-बेस्ड मिल्क)
बदाम, ओट्स व नारळाचे दूध हे गाईच्या दुधाच्या तुलनेत किडनीसाठी अधिक हलके आणि उपयुक्त असते. त्यात नैसर्गिकरीत्या पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असल्यामुळे किडनी कमजोर असलेल्या लोकांसाठी हे उत्तम पर्याय मानले जातात.
५. इन्फ्युज्ड वॉटर (पाण्यात फळं, हर्ब्स किंवा मसाले टाकून त्याचा स्वाद आणि पौष्टिकता वाढवलेले पाणी)
फळं, हर्ब्स किंवा मसाल्यांनी पाण्याचा स्वाद आणि पौष्टिकता वाढवलेले पाणी शरीरासाठी हितकारक असते. लिंबू-पुदीना, काकडी-आले, स्ट्रॉबेरी-ब्लूबेरी अशा संयोजनांचे इन्फ्यूज्ड वॉटर प्यायल्याने शरीरात पुरेसे पाणी राहते आणि हायड्रेशन सोपे होते.
नियमितपणे पुरेसे पाणी आणि हे नैसर्गिक पेय घेतल्याने किडनी सुदृढ राहते. त्यामुळे शरीरातील विषाक्त घटक सहजगत्या बाहेर पडतात आणि एकूणच आरोग्य सुधारते.