Vegetable for Piles Relief: थंडीचे दिवस आले की अनेकांचा जुन्या आजारांचा त्रास पुन्हा डोकं वर काढतो. त्यात सर्वाधिक त्रासदायक ठरतो तो म्हणजे मूळव्याध (Hemorrhoids / Piles). ज्याला वैद्यकीय भाषेत पाइल्स म्हणतात. ही अशी व्याधी आहे, जी माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीला अक्षरशः पोखरून टाकते. बसणं, उठणं, चालणंही कठीण होतं; तर कामकाजाची गती पूर्णपणे विस्कळीत होते.
बहुतेक वेळा या आजाराची मुळं असतात पोट साफ न होणे आणि अयोग्य पचनक्रिया. शरीरातील घाण, अन्नातील तंतूंचा अभाव आणि पाण्याचं कमी सेवन, यामुळे पचनतंत्र मंदावतं आणि त्यातून तयार होतो मूळव्याधीचा त्रास. अनेक जण लाजेपोटी उपचार घेत नाहीत आणि मग स्थिती अधिक गंभीर बनते.
तज्ज्ञ सांगतात, मूळव्याधीवर औषधं आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, पण जर तुम्ही पचनसंस्थेची काळजी घेतली तर हा त्रास नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकतो; त्यासाठी काही घरगुती उपायही अत्यंत प्रभावी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अद्भुत भाजीबद्दल सांगणार आहोत, जी मूळव्याध आणि बद्धकोष्ठता दोन्हींवर रामबाण उपाय ठरू शकते.
होय, ही भाजी तुमच्या स्वयंपाकघरातही असू शकते, पण तिचे गुण तुम्हाला माहीत नसतील. कृषी तज्ज्ञांच्या मते ही भाजी जमिनीखाली उगवते आणि तिच्यात व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
तिच्यातील अँटीऑक्सिडंट आणि सूज कमी करणारे गुणधर्म शरीरातील अंतर्गत दाहावर प्रभावीपणे काम करतात. या भाजीचा नियमित आहारात समावेश केल्याने मूळव्याधीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि सूज हळूहळू कमी होऊ शकते.
याशिवाय यात असलेला उच्च तंतुमय घटक (High Fiber) मल मऊ करतो आणि आंत्रसंस्थेचं स्वच्छीकरण करतो, त्यामुळे मूळव्याधीपासून नैसर्गिक आराम मिळतो. इतकंच नव्हे तर ही भाजी रक्ताभिसरण सुधारते.
तज्ज्ञ सांगतात, या भाजीचा योग्य उपयोग केला तर ती शरीराला आतून मजबूत करते, पचनसंस्था स्वच्छ ठेवते आणि मूळव्याधीसारख्या समस्यांपासून दूर ठेवते. तिचं सेवन उकडून, भाजून किंवा हलक्या मसाल्यात परतून करता येतं.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही भाजी नेमकी कोणती?
तर उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
ही भाजी म्हणजेच “सूरण” (ज्याला काही भागांत जिमीकंद किंवा ओल असं म्हणतात). सूरण म्हणजे निसर्गाने दिलेले एक अद्भुत वरदान! आहारात नियमितपणे याचा समावेश केल्यास पचनशक्ती वाढते, बद्धकोष्ठता दूर राहते आणि मूळव्याधीचा त्रासही लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
टीप: वरील माहिती ही आरोग्यविषयक सामान्य माहितीच्या स्वरूपात दिली आहे. कोणताही वैद्यकीय त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
