Coronavirus New Symptoms: भारतासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रोन प्रकारातील BA.4 आणि BA.5 या उप-प्रकारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रोनच्या BA.4 आणि BA.5 उप-प्रकारांनी भारतात दार ठोठावले आहे. या उप-प्रकारची प्रकरणे यूकेमध्येही येत आहेत. दरम्यान, यूकेच्या एका एजन्सीला नवीन उप-प्रकारातून संसर्गाची नवीन लक्षणे आढळून आली आहेत.

द इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, UK मध्ये ओमिक्रोन BA.5 प्रकारांची कोविड प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या प्रकाराची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांनी रात्री झोप न लागणे आणि झोपताना भरपूर घाम येणे अशी तक्रार केली आहे. ट्रिनिटी कॉलेज डब्लिनचे प्रोफेसर ल्यूक ओ’नील यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आयरिश रेडिओ स्टेशनला सांगितले की, “आज सकाळी BA.5 व्हेरिएंटचे एक अतिरिक्त लक्षण माझ्या लक्षात आले…. रात्री घाम येतो.”

( हे ही वाचा: Monkeypox: मंकीपॉक्स अभ्यासात आढळून आली तीन नवीन गंभीर लक्षणे; वेळीच जाणून घ्या)

ते म्हणाले, “तथापि, त्यात थोडी प्रतिकारशक्तीही आहे. टी-पेशींद्वारे प्रतिकारशक्ती स्पष्टपणे तयार होत आहे. त्याचप्रमाणे, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती आणि व्हायरसचा थोडासा वेगळा स्वरूप मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला रात्री झोपताना खूप घाम येत असेल तर वेळीच सावधान व्हा आणि तुमची कोविड चाचणी करून घ्या.

पाहा व्हिडीओ

नवीन अभ्यास काय सांगतो?

नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविड-१९ लस या प्रकाराविरूद्ध चारपट जास्त प्रतिरोधक आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी अद्याप लसीकरण केलेले नाही किंवा बूस्टर डोस घेतलेला नाही अशा लोकांना उप-प्रकाराचा संसर्ग होण्याची शक्यता चार पट जास्त असते. तर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ७.५ पट जास्त आहे. तसेच, मृत्यूची शक्यता १४ ते १५ पट आहे.

( हे ही वाचा: Monkeypox Virus: गर्भवती महिला आणि मुलांना मंकीपॉक्सचा धोका जास्त असतो; अशाप्रकारे स्वतःचे संरक्षण करा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेत सापडला हा प्रकार

BA.5 पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारीमध्ये शोधला गेला. याच देशात BA.4 ओळखल्यानंतर एका महिन्यानंतर या उप-प्रकारची पुष्टी झाली. येथून ही दोन्ही उप-रूपे जगभर पसरली आहेत. त्याचा संसर्ग ब्रिटन आणि युरोपमध्ये वेगाने पसरत आहे. अमेरिकेतही प्रकरणे आढळून आली आहेत.