sleeping in the afternoon : झोप ही व्यक्तीची प्रिय गोष्ट आहे. काही लोकांना दुपारी सुद्धा झोपण्याची सवय असते पण दुपारी विश्रांती घेणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? अनेकदा आपल्याला दुपारी न झोपण्याचा सल्ला दिला जातो. खरंच दुपारी झोपल्यामुळे आपले वजन वाढते का? आज आपण या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

न्युट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दुपारी झोपल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.

अमिता गद्रे या व्हिडीओमध्ये सांगतात, “दुपारी झोपल्यामुळे एकच महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे आपल्याला आराम मिळतो. संपूर्ण दिवस तुम्हाला काम करायचे असते, तुम्ही सकाळी लवकर उठता, किंवा वर्कआउट किंवा व्यायाम करता, इत्यादी गोष्टींमुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते.दुपारी झोपल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम किंवा कॅलरी घेण्याच्या पद्धतीवर फरक जाणवत नाही”
दुपारी जास्त वेळ झोपण्याविषयी बोलताना अमिता गद्रे पुढे सांगतात, “दुपारी जास्त झोप घेतल्यामुळे तुमच्या रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम जाणवू शकतो. जर तुम्ही दुपारी एक तास किंवा त्यापेक्षा जास्त झोपत असाल तर तुम्हाला कदाचित रात्री लवकर झोप येणार नाही किंवा गाढ झोप येणार नाही. जर तुम्हाला दुपारी किंवा सकाळी उठल्यानंतर पुन्हा झोपायची तंद्री येत असेल तर अशावेळी १५ ते २० मिनिटांची झोप घेण्यास काहीही हरकत नाही.”

हेही वाचा : Yoga for Snoring : तुम्हाला घोरण्याची समस्या आहे का? ‘हा’ योगा ठरेल फायदेशीर, पाहा व्हिडीओ

अमिता गद्रे पुढे सांगतात,”याशिवाय तुम्ही तुमच्या शरीरातील प्रोटिन पातळी आणि व्हिटामिन D3, B12 आणि लोहाची पातळी तपासणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला आहारामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का, याविषयी समजेल. झोपेचे वेळापत्रक बनवा यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते आणि तुम्हाला दिवसा झोपेची तंद्री येणार नाही.चांगली झोप तुम्हाला फॅट लॉस करण्यास मदत करू शकते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amitagadre या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अमिता गद्रे यांनी व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वजन कमी करायचे असेल तर दुपारी झोपू नका असे तुम्हाला कोणी सांगितले आहे का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कृपया मॅडम, मराठीमध्ये व्हिडीओ बनवा” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही निवडलेला विषय मला खूप आवडला” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान पद्धतीने सांगितले” काही युजर्सनी माहिती सांगितल्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त केले आहे.