Health Tips : त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे Tea Tree oil; ‘या’ समस्यांपासून करते रक्षण

टी ट्री ऑइलमध्ये असे काही घटक असतात जे बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहेत.

tea tree oil pexels
त्वचेसोबतच हे आपल्या केसांसंबंधी समस्यांचेदेखील निराकरण करते. (Photo : Pexels)

त्वचेसाठी टी ट्री ऑइल अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेसोबतच हे आपल्या केसांसंबंधी समस्यांचेदेखील निराकरण करते. टी ट्री ऑइलमध्ये असे काही घटक असतात जे बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. टी ट्री ऑइलमध्ये आढळणाऱ्या हायड्रोकार्बन्सचा समूह टेरपेनिओल्समध्ये (Terpeneols) प्रतिजैविक गुणधर्म असतात. त्वचेची अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपचार आहे.

मुरुमांवर अत्यंत गुणकारी

टी ट्री ऑइलच्या वापराने मुरुमांची समस्या दूर होईल. यात प्रतिजैविक गुणधर्म असल्याने हे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून कार्य करते. त्याच्या वापरामुळे सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते.

तरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा

जखम भरण्यास मदत करते

टी ट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. हे कोणत्याही प्रकारच्या जखमेतील संसर्गजन्य जीवाणू नष्ट करते आणि जखम भरण्यास मदत करते.

फंगल इन्फेक्शन दूर ठेवते

टी ट्री ऑइलचा वापर केल्याने नखांमध्ये फंगल इन्फेक्शनची समस्याही दूर होईल. यासाठी खोबरेल तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळून प्रभावित भागावर लावल्याने याचा फायदा होईल.

तेलकट त्वचेची समस्या दूर करते

टी ट्री ऑइलचा वापर तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरेल. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेतील सेबमचे उत्पादन कमी होते.

Health Tips : हिवाळ्यात रात्री स्वेटर घालूनच झोपताय? होऊ शकतं मोठं नुकसान; आजच बदला सवय

त्वचेची अ‍ॅलर्जी

टी ट्री ऑइलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते त्वचेची अ‍ॅलर्जी दूर करून खाज येण्याची समस्या कमी करते. पापण्यांजवळ खाज येण्याची समस्या असल्यास टी ट्री ऑइलचा वापर केल्यासही फायदा होतो. टी ट्री ऑइलचे काही थेंब मॉइश्चरायझरमध्ये मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला लावा.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tea tree oil extremely beneficial for skin protects against many problems pvp

Next Story
तरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी