ज्योतिषशास्त्रात कुंडलीचे व्यक्तिगत जीवनात विशेष महत्त्व आहे. जन्म तारीख, जन्म वेळ यासह जन्म ठिकाण यावरून कुंडलीतील ग्रह नक्षत्रांची मांडणी होते. त्यानंतर गुण आणि दोष याबद्दल माहिती मिळवली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील दोष जीवनातील बऱ्याच गोष्टी ठरवत असतात. मेहनत करूनही योग्य लाभ मिळत नसेल तर कुंडलीतील दोष त्याला कारणीभूत ठरत असतात. कुंडलीत पाच दोष सर्वाधिक त्रासदायक आहेत. यापैकी एकही दोष असेल जीवनात अनेक कठीण समस्यांना सामोरं जावं लागतं असा ज्योतिषशास्त्रात समज आहे. दोषामुळेआर्थिक, करिअर, नात्यांमध्ये दुरावा, आजारपण त्याशिवाय मानसन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रभाव पडत असतो.

कालसर्प दोष- कुंडलीत कालसर्प दोष असल्यास अडचणींना सामोर जावं लागते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. कुंडलीत कालसर्प दोष राहु आणि केतु एकत्र आल्याने होतो. या व्यतिरिक्त जर सात प्रमुख ग्रह राहु आणि केतुच्या अंमलाखाली आल्यास व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष उत्पन्न होतो. यामुळे जीवन संघर्षमय जगावं लागतं. तसेच होणारी कामंही होत नाहीत.

कालसर्फ दोष निवारण पूजा करा

  • देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करा
  • मंगळवारी राहु आणि केतुसाठी अग्नि अनुष्ठान करा
  • हनुमान चालीसाचं पठण करा
  • दुर्गा चालीसाचं पठण करा

मंगळ दोष- वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ दोषाची गणना त्रासदायक दोषांमध्ये केली जाते. या दोषामुळे नात्यात तणाव निर्माण होतो. कुंडलीत मंगळ पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तेव्हा मांगलिक दोष होतो. हा दोष विवाहासाठी अशुभ मानला जातो. यशस्वी दाम्पत्य जीवनासाठी दोघांच्याही जीवनसाथीच्या कुंडलीत मंगल दोष नसणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर लग्नानंतर नातेसंबंधावर विपरीत परिणाम दिसू लागतात.

मंगळ दोष निवारणासाठी

  • हनुमान चालीसाचे पठण करा
  • मंगळ ग्रहासाठी अग्नि अनुष्ठान करा
  • १०८ वेळा “ओम भोगाय नम:” चा जप करा
  • मंगळ दोष निवारणासाठी पूजा करा
  • मंगळवारी दुर्गा देवीची पूजा आणि दीप लावा

केंद्राधिपति दोष: कुंडली जेव्हा एखाद्या शुभ ग्रहाची राशी केंद्रस्थानी असते तेव्हा त्याला केंद्राधिपति दोष गणला जातो. गुरु, बुध, शुक्र आणि चंद्र शुभ ग्रह आहेत. यापैकी गुरू आणि बुध ग्रहांमुळे होणारा हा दोष अधिक गंभीर आणि परिणामकारक मानला जातो. पहिली, चौथी, सातवी आणि दहावी केंद्र भाव आहेत. यानंतर शुक्र आणि चंद्राचे दोष येतात. वरील दोष फक्त शुभ ग्रहांना लागू आहेत. हा दोष शनि, मंगळ आणि सूर्य यांसारख्या ग्रहांना लागू होत नाही. या दोषामुळे व्यक्तीला करिअरशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

केंद्राधिपती दोष निवारणासाठी

  • मंदिरात दर दिवशी शंकराची पूजा करणे
  • दर दिवशी २१ वेळा ‘ओम नमो नारायण’चा जप करणे
  • रोज ११ वेळा ‘ओम नम: शिवाय’ मंत्राचा जप करणे

पितृ दोष: बहुतेक लोकांना या दोषाबद्दल माहिती असते. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याचा केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो. या दोषामुळे जीवनातील विकास थांबतो. अशा व्यक्तींना एकतर नोकऱ्या मिळत नाहीत किंवा सापडल्या तर त्यांना खूप कमी पगार मिळतो.

पितृदोष निवारणासाठी उपाय

  • दररोज कावळे आणि पक्षांना खाणं द्या
  • दिवंगत पूर्वजांचं तर्पणविधी कर
  • पितृदोष निवारणासाठी पूजा करा

गुरु चांडाळ दोष: सर्वात मोठा नकारात्मक दोष म्हणजे ‘गुरु-चांडाळ’ दोष. राहू गुरू जर कुंडलीत एकत्र असेल तर तो दोष होतो. कुंडलीत कुठेही हा दोष निर्माण झाला तर नेहमीच नुकसान होते. जर ते चढत्या, पाचव्या किंवा नवव्या घरात असेल तर ते विशेषतः नकारात्मक आहे. गुरु-चांडाळ दोष वेळेवर दूर केला नाही तर कुंडलीतील सर्व शुभ योग विस्कळीत होतात. अनेकदा हा दोष असण्याने व्यक्तीचे चारित्र्य कमकुवत होते.
या योगामुळे व्यक्तीला पचनसंस्था, यकृत समस्या आणि गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती उधळपट्टीत किंवा इकडे तिकडे पैसे खर्च करतात आणि त्यांच्या भविष्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरु चांडाळ दोष निवारणासाठी

  • गायत्री मंत्राचा जप करा
  • दरदिवशी सकाळी आणि संध्याकाळी १०८ वेळा गायत्री मंत्र जप कर
  • भगवान विष्णूंची उपासना करा आणि गुरू ग्रहाची दर गुरुवारी पूजा करा
  • गुरुवारी गरजवंतांना चना डाळ आणि गुळ दान करा
  • चांडाळ दोष पूजा करा
  • दरदिवशी १०८ वेळा ओम गुरवे नम: मंत्राचा जप करा
  • ओम राहवे नम: मंत्रांचा दरदिवशी १०८ वेळा जप करा