Winter Health Problem: हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. संधिवात, हृदयरोग किंवा हाडांचे आजार असलेल्या लोकांसाठी सर्दी ही समस्या असू शकते. हिवाळ्यात काहींना हाडे दुखणे, सांधेदुखी, हात-पायांमध्ये मुंग्या येणे असे त्रास होतात. संधिरोग किंवा यूरिक ऍसिड वाढणे ही देखील काही लोकांमध्ये आढळणारी समस्या आहे. सांध्यांमध्ये युरिक ऍसिड साठल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे हालचाल करणेही कठीण होते.

युरिक अॅसिडची समस्या वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कारण वाढत्या वयानुसार हाडे आणि सांध्याशी संबंधित हा त्रास आणखीनच त्रासदायक होऊ शकतो. अशा लोकांना हिवाळ्यात पुन्हा-पुन्हा असा त्रास होत असल्यास त्यांनी काही भाज्या आणि थंड पदार्थ टाळावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जास्त युरिक ऍसिडचा त्रास होत असताना कोणते पदार्थ टाळावेत जाणून घ्या…

( हे ही वाचा: Oral Contraceptive Pills: महिलांनो गर्भनिरोधक गोळ्या घेत आहात? तर ‘या’ पाच गोष्टी अवश्य जाणून घ्या)

आरोग्यासाठी डॉक्टर नेहमी कडधान्ये खाण्याचा सल्ला देतात. पण जास्त युरिक अॅसिडची समस्या असल्यास साली असलेल्या डाळी खाणे टाळावे. डाळ आरोग्यासाठी चांगली असली तरी त्यामुळे युरिक अॅसिड वाढते आणि तीव्र वेदना होतात.

दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. पण, त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. हे ट्रान्स फॅट्स शरीरासाठी हानिकारक असतात. मांस आणि माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. संधिरोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हिवाळ्यात मांस आणि मासे खाणे टाळा.

( हे ही वाचा: हिवाळ्यात डायबिटीज रुग्णांनी आहारात ‘या’ ५ गोष्टींचा समावेश नक्की करा; रक्तातील साखर नियंत्रणात राहील)

हिवाळ्यात मटार खूप खाल्ले जातात. पण मटारमध्ये असलेले प्युरीन हानिकारक आहे. त्यात प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते. यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते. त्यामुळे युरिक अॅसिडचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात मटार खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात. तसेच हिवाळ्यात प्रथिनेयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करणे हानिकारक आहे. ज्या लोकांना युरिक ऍसिडची समस्या आहे त्यांनी हिवाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.