सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. अशातच नियमित आहार न घेणे, वाढते प्रदूषण आणि केसांवर केमिकल बेस उत्पादनांचा वापर यामुळे केस कोरडे आणि निर्जीव बनतात. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण केसांवर विविध केमिकल बेस ट्रिटमेंट करतो. काहींना सिल्की केस आवडतात, तर काहींना कुरळे केसांची क्रेझ आहे. केसांचे सौंदर्य वाढवणारे रासायनिक उत्पादन केसांना काही दिवस सुंदर तर करतातच पण केसांना आतून कमकुवत आणि निर्जीव बनवतात.

केसांवर केमिकल उत्पादने वापरल्याने केस कमकुवत होतात आणि लवकर तुटतात, त्यामुळे केसांची वाढ कमी होऊ लागते. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांची जाडी खूप महत्त्वाची असते. जर तुम्हालाही कमकुवत आणि पातळ केसांचा त्रास होत असेल तर केस मजबूत आणि दाट करण्यासाठी काही खास पद्धतींचा अवलंब करावा लागेल. चला जाणून घेऊया केस दाट आणि मजबूत करण्यासाठी कोणत्या खास टिप्सचा अवलंब केला जाऊ शकतो.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

मजबूत केसांसाठी अंड्यांसोबत बिअरचा वापर करा

केस लवकर तुटतात आणि केस पातळ असल्यास अंडी आणि बिअरचा मास्क लावा. केसांना अंडी लावल्याने केस चमकदार आणि सुंदर होतात. अंड्यांसोबत बिअर वापरल्याने कोंडा दूर होतो आणि केस मजबूत होतात. बिअरने केस धुणे फायदेशीर ठरतं कारण बिअर धान्यापासून तयार केली जाते. त्यामुळे यात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन बी केसांना आणि डोक्याच्या त्वचेला पोषण देण्याचं काम करतात. तसेच यातील माल्टोज आणि ग्लूकोजमुळे केसांना मजबूती मिळते.

तेलाने मालिश करा

दाट आणि सुंदर केसांसाठी केसांना तेलाने मसाज करणं खूप गरजेचं आहे. मसाजसाठी आवळा तेल वापरू शकता. आवळा तेलाने मसाज केल्याने तुम्हाला स्प्लिट एंड्सपासून मुक्तता मिळेल, तसेच केसांची वाढ देखील करते.

आहारात विशेष पदार्थांचा समावेश करा

केसांची वाढ नीट होण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळू शकेल. केसांच्या वाढीसाठी प्रथिने आणि कर्बोदके आवश्यक असतात. लाल तांदूळ, डाळी आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.

केस विंचरण्याची पद्धत बदला

केस कमकुवत होतात आणि त्वरीत तुटतात त्यामुळे केसांची मात्रा कमी होते. याकरिता तुम्ही केस विंचरण्याची पद्धत बदला. ओले केस कधी विंचरू नका, कारण ओले केस लवकर कमकुवत होतात आणि तुटतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)