आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेलं कोलेस्ट्रॉल म्हणजे हृदयरोगाचं सर्वात मोठं कारण ठरतंय. शरीरात लो-डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजेच ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ वाढलं की ते रक्तवाहिन्यांमध्ये चरबीच्या थराचं रूपांतर होतं आणि त्यामुळे अडथळे येतात परिणामी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. मात्र, फक्त औषधांनी नव्हे तर आहारात आणि जीवनशैलीत केलेले छोटे-छोटे बदलही हृदयाचं आरोग्य सुधारू शकतात.

संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण ही चार मूलभूत तत्त्वं पाळली, तर हृदय बराच काळ निरोगी राहू शकतं. हेल्थलाइनच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात आधी आहारात बदल करणं गरजेचं आहे. ट्रान्स फॅट, प्रोसेस्ड फूड आणि रिफाइंड शुगर हे पदार्थ रक्ताला घट्ट आणि चिकट बनवतात, त्यामुळे चरबी साचते. अशावेळी काही नैसर्गिक ड्रिंक LDL कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतात. चला जाणून घेऊ या ते कोणते पेय आहेत.

ग्रीन टी – नैसर्गिक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते (Green Tea – Natural Cholesterol Regulator)

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, ग्रीन टी हे हृदयासाठी अत्यंत लाभदायक पेय आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅव्होनॉइड्स शरीरातील सूज किंवा दाह कमी करतात आणि धमन्यांमध्ये जमा झालेली फॅट्स विरघळवतात. नियमितपणे साखरविरहित ग्रीन टी घेतल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि एकूण कोलेस्ट्रॉल दोन्हीचं प्रमाण घटतं.

डाळींबाचा रस – धमन्या राहतात स्वच्छ (Pomegranate juice – keeps arteries clean)

डाळींबाचा म्हणजे अँटिऑक्सिडंट्सचं पॉवरहाऊस! हे वाईट कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिडेशनला थांबवतं आणि धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊ देत नाही. त्यामुळे ब्लड फ्लो सुधारतो आणि हृदयावरील ताण कमी होतो. मात्र ज्यांना कमी रक्तदाब किंवा हृदयविकारासाठी औषधे सुरू आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावं.

सोयाचे दूध – कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारं पेय (Soy milk – a drink that controls cholesterol)

सोयाच्या दूधमध्ये असलेले वनस्पतीजन्य प्रोटीन LDL कोलेस्ट्रॉल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. दररोज साखरविरहित सोयाचे दूध प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स साचत नाही. हे पेय तुम्ही स्मूदी किंवा कॉफीमध्येही वापरू शकता.

टोमॅटोचा रस – हृदयासाठी संरक्षक कवच (Tomato Juice – A Protective Shield For The Heart)

टोमॅटोच्या रसा मध्ये असलेलं लायकोपीन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हे LDL कोलेस्ट्रॉलच्या दुष्परिणामांना कमी करतं आणि HDL म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये थोडी सुधारणा घडवून आणतं. मीठ नसलेले टोमॅटोचे रस रोज प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि रक्तदाबही संतुलित राहतो.

बीटाचा रस – चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पेय (Beetroot Juice – a Drink That Increases Good Cholesterol)

बीटाचा रसामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स आणि बेटोनिन हे घटक हृदयाचं कार्य सुधारतात. हे पेय सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं, ज्यामुळे धमन्या स्वच्छ राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. कमी फॅट आणि कमी सोडियम असलेला हा रस हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.