थायरॉईड (Thyroid) हा एक असा आजार आहे, ज्यासाठी चुकीची लाइफस्टाइल कारणीभूत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सर्व थायरॉईडसारखे आजार होतात. हा एक असा आजार आहे ज्याचा महिलांना जास्त धोका असतो.

काय आहेत थायरॉईडची लक्षणे

या आजारात प्रकारची लक्षणे दिसू लागतात, जसे की अति थकवा येणे, केस गळणे, वेळेवर मासिक पाळी न येणे, तणाव इत्यादी. याशिवाय घाम येणे, वारंवार भूक लागणे ही देखील थायरॉईडची लक्षणे आहेत.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड ग्रंथी थायरॉक्सिन नावाचे हार्मोन तयार करते. हा हार्मोन शरीरातील मेटाबॉलिज़्म वाढवतो आणि शरीरातील पेशी नियंत्रित करतो.शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. डाउन टू अर्थच्या अहवालानुसार, आपल्या देशात ४० दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. थायरॉईडपासून बचाव करायचा असेल तर या आजाराची लक्षणे समजून घ्या आणि काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.

(हे ही वाचा: Hair Care Tips: हिवाळ्यात कोंडयाचा त्रास होतोय? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा)

जवसाचे करा सेवन

जवसामध्ये कॅलरीज, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात, जे थायरॉईड नियंत्रित करतात, तसेच वजन वाढू देत नाहीत.

नारळ

थायरॉईडच्या रुग्णांनी नारळाचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढेल, तसेच थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळेल. खोबरे कच्चे, खोबरेल तेल, चटणी आणि लाडू बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

(हे ही वाचा: थंड किंवा गरम? कोणत्या प्रकारच्या पाण्याने केस धुवावे?)

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधामध्ये ट्रायटरपेनॉइड ग्लायसिररेटिनिक ऍसिड असते, जे थायरॉईड कर्करोगाच्या पेशी नष्ट करते, तसेच ते नियंत्रित करते.

मशरूम

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध मशरूम थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच मशरूम थायरॉईड देखील नियंत्रित करते.

(हे ही वाचा: ब्लड शुगर सोबत काजू हाय बीपीही ठेवते नियंत्रित; जाणून घ्या इतर फायदे)

हळदीचे दूध देखील गुणकारी

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे. हळदीसोबत दुधाचे सेवन केल्याने थायरॉईड नियंत्रण राहते, तसेच अनेक आजारांवर उपचार होतात. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद टाकून प्या.

कोथिंबीर

धन्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. दररोज एका ग्लास पाण्यात २ चमचे संपूर्ण धणे घाला आणि रात्रभर भिजवा. ही कोथिंबीर सकाळी पाण्यात पाच मिनिटे उकळवा आणि नंतर गाळून सेवन करा, फायदा होईल.

(हे उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या)