१ डिसेंबरपासून म्हणजे उद्यापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंकिंग इत्यादींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह काही नवीन नियम लागू होतात.

UAN-आधार लिंकिंग

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), तर ३० नोव्हेंबरपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक करा. १ डिसेंबर २०२१ पासून, कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ECR दाखल करण्यास सांगितले आहे ज्यांचे UAN आणि आधार लिंकिंग सत्यापित झाले आहे. जे कर्मचारी उद्यापर्यंत ही लिंक दाखल करू शकणार नाहीत ते ECR देखील दाखल करू शकणार नाहीत.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

गृह कर्ज ऑफर

सणासुदीच्या काळात बहुतेक बँकांनी गृहकर्जाच्या विविध ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या ऑफर ३१ डिसेंबर रोजी संपत आहेत. परंतु यात LIC हाउसिंग फायनान्स ऑफर ही ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आज संपत आहे.

SBI क्रेडिट कार्ड

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI च्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होईल. SBI कार्ड वापरल्यावर फक्त व्याज भरावे लागणार होते पण १ डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.

गॅस सिलेंडरची किंमत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जारी केले जातात. नवीन दर १ डिसेंबरला सकाळी जाहीर केले जातील.

जीवन प्रमाणपत्र

तुम्ही देखील पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर तुमच्याकडे २ दिवस शिल्लक आहेत. पेन्शनधारकांनी आज किंवा उद्या या दोन दिवसांत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा १ डिसेंबरपासून तुम्हाला पेन्शन मिळणे बंद होईल.