आवळा म्हणजे पोषक तत्वांचा खजिना. यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असतं, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि संसर्गांपासून संरक्षण करतं. यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोस्यानिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्वं आढळतात. ‘इंडियन गूजबेरी’ म्हणून ओळखला जाणारा आवळा पचनसंस्थेसाठीही एक वरदान आहे. जर तुम्ही रोज एक आवळा खात असाल, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुमच्या शरीरावर दिसू शकतात. मात्र त्यासाठी आवळा खाण्याची योग्य पद्धत आणि काही सावधानता माहित असणं गरजेचं आहे.
दररोज एक आवळा खाल्ल्याचे फायदे (Health Benefits of Eating One Amla Daily)
- दररोज आवळा खाल्ल्याने केस आणि त्वचेला मोठा फायदा होतो.
- केसगळती कमी होते, केस काळे, मजबूत आणि चमकदार बनतात.
- त्वचा तजेलदार आणि तरुण दिसते.
- यात असलेले व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळे वारंवार आजारपण येत नाही.
- आवळ्यातील फायबर पचनसंस्था मजबूत ठेवते, गॅस आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो.
- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
आवळा खाण्याची योग्य पद्धत (Best Ways to Consume Amla)
कच्चा आवळा: सकाळी रिकाम्या पोटी एक आवळा खाणं सर्वात फायदेशीर.
आवळा रस: दिवसाची सुरुवात एक ग्लास ताज्या आवळा रसाने करा.
आवळा मुरंबा: स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय म्हणून मुरंबा वापरू शकता.
आवळा चूर्ण: जेवणानंतर अर्धा चमचा आवळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता.
आवळा खाताना घ्यावयाची काळजी (Precautions While Eating Amla)
जास्त फायदा मिळवण्यासाठी आवळ्याचं अतिसेवन करू नका; त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.
डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावं.
सर्दी-जुकाम असल्यास आवळा टाळावा.
