Health Benefits of Buttermilk: ताक हे गरीबांचे सर्वात स्वस्त औषध आहे. ताक, भाकरी, कांदा आणि गूळ हा गरीबाचा साधा आहार. परंतु हाच साधा आहार शरीरातील अनेक दोष दूर करतो. आरोग्य सुदृढ ठेवतो. ताक शरीरासाठी उत्तम आहे. पूर्वी तर लोक जेवणानंतर ताक घेत होते. कारण अन्न पोटामध्ये गेल्यावर त्याचे पचन व्यवस्थितरीत्या आणि पोट शांत राहावे, यासाठी उपयोग होत असतो. ताकात विटामिन B 12 कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात, जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. जाणून घेऊया ताकाचे आपल्या आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे कोणते आहेत.
ताक पिण्याचे फायदे
ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. यासाठी आरोग्यतज्ञ नेहमी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला देतात. यासाठीच जाणून घेऊ या ताक पिण्यामुळे आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो.
१. डिहाड्रेशनपासून बचाव होतो
दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक निर्माण होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.
२. पचनशक्ती सुधारते
ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. कारण यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते. कारण, ताकामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते. अपचन आणि पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताकामुळे तुम्हाला अन्नातून झालेले पोटाचे इनफेक्शन अथवा फूड पॉईझनिंगचा त्रास होत नाही.
(आणखी वाचा : Anti-aging Face Yoga: चेहऱ्यावरील सुरकुत्या आणतात तुमच्या सौंदर्यात बाधा? नियमितपणे करा ‘हा’ फेशियल योगा! )
३. हाडे आणि दातांसाठी उत्तम
ताक हे दह्यापासून तयार केले जाते. ज्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. एक कप ताकामध्ये जवळ जवळ शंभर मिग्रॅ कॅल्शिअम असतात. तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी शरीराला सतत कॅल्शिअमची गरज असते. कारण त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. जे लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांचे विकार अथवा दाताची दुखणी कमी प्रमाणात होतात. ताकामधून तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शिअमचा योग्य पूरवठा केला जातो.
४. अॅसिडिटी कमी होते
बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील अॅसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते.
५. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ह्रदयावर ताण येऊन ह्रदयविकार होतात. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका टाळता येतो. निरोगी ह्रदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल.
६. रक्तदाब कमी होतो
आजकाल कामाची दगदग, चिंता, काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असतो. बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपटेंशन, ह्रदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो. कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशिअम असते. यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे.
(आणखी वाचा : Periods Tips: मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं? मग ‘हे’ पदार्थ सेवन करा, मिळेल आराम )
७. त्वचेसाठी उत्तम
ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. कारण ताक पिण्यामिुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स यामुळे बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे ताकामधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉस्चराईझ करते, त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरूण ठेवते.
८. वजन कमी करण्यास मदत
ताक हे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्त्रोत आहे. शिवाय त्यात कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते. शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी प्रमाणात खाता. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा. कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे पोषणही योग्य प्रमाणात होते.