पाणी हा आपल्या जीवनाचा आधार आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. परंतु योग्य पाणी पिणे आणि वापरणे याला खूप महत्त्व आहे. खराब पाण्यातून अनेक आजारही पसरतात. म्हणूनच पाणी गाळून आणि उकळून पिण्याचा सल्ला आपल्याला घरातील मोठी माणसे देत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्राण्याचे देखील दोन प्रकार आहेत. एक आहे सॉफ्ट वॉटर आणि दुसरे म्हणजे हार्ड वॉटर. तुम्ही कोणते पाणी पीत आहात, तसेच कोणत्या पाण्याने आपले शरीर आणि केस धुवत आहात याला देखील महत्त्व आहे. कारण हार्ड वॉटर आपल्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक जास्त असतात, त्यामुळे या पाण्यातील थंडावा संपतो. याशिवाय त्यामध्ये सोडियम देखील असते. हे मुख्य कारण आहे की हार्ड वॉटर आपल्याला अनेक प्रकारे नुकसान करते. तथापि, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वॉटर सॉफ्टनर प्रणालीद्वारे काढले जातात.

भंगारातील ‘या’ उपयोगी वस्तू चुकूनही टाकून देऊ नका; ‘अशा’ पद्धतीने करता येईल पुनर्वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. हार्ड वॉटर आणि क्लोरीन हे केस गळणे, कोरडी त्वचा आणि इतर त्वचेसंबंधीच्या समस्यांचे प्रमुख कारण आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या घरात कोणते पाणी वापरले जाते याकडे लक्ष द्यावे लागेल.