या थंडगार वातावरणात आपण उबदार कपडे घालून गरम पदार्थांचा आस्वाद घेण्यात आणि पहाटे अधिक वेळ पांघरुणात गुरफटून राहण्याचा विचार करीत असतो. या वातावरणामध्ये आपले शरीर सुस्तावते आणिअशा सुस्तीने आपली दिवसभराची कामे रेंगाळत पडून राहतात. त्यामुळे कधी कधी थंडीतील हे लहान होत जाणारे दिवस अधिकच लहान जाणवू लागतात. अशा आळशी आणि शिथिल हवेमुळे आपण फारशी काही हालचाल करीत नाही आणि व्यायामाकडेही दुर्लक्ष केले जाते. परंतु, आरोग्याकडे असा काणाडोळा केल्यानेच थंडीत बऱ्याचशा समस्या उदभवतात. खासकरून हृदयासंबंधित आजार अधिक जास्त डोके वर काढतात.

“हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. कारण- अशा थंड हवेमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या बळावू शकतात. थंडीमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता नाही, असे समजून बरीच मंडळी पाण्याचे सेवन कमी करतात. परिणामी डिहायड्रेशनचा त्रास होतो. हृदयासाठी, हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी शरीर हायड्रेट असणे प्रचंड गरजेचे असते. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ, डाळी यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करून, तेलकट, अधिक कॅलरीज असणारे पदार्थ, साखरेचे पदार्थ, सोडियमचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाणे शक्य तितके टाळावे. सोबतच हलका व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. पुरेशी झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे असते,” असा सल्ला नोएडा एक्स्टेंशन इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर कृष्ण यादव यांनी दिल्याचे हिंदुस्थान टाइम्समधील माहितीवरून समजते.

mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळे अन् चेहरा थकल्यासारखा दिसतोय? त्वचेची काळजी घेतील ‘हे’ पाच घरगुती फेस पॅक, पाहा

परंतु थंडीमध्ये आरोग्याच्या कुरबुरींपासून दूर राहायचे असल्यास सकाळी काही कृतीयुक्त सवयी लावून घेणे उपयुक्त ठरू शकते. नवी दिल्लीमधील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील कार्डिओथोरॅसिक, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मुकेश गोयल यांनी हिवाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱ्या पाच सवयी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहू.

हिवाळ्यातील आरोग्यदायी पाच सवयी

१. शरीरातील पाण्याची पातळी [हायड्रेशन]

हिवाळ्यात हवा गार असते, त्यामुळे सतत पाणी पिण्याची गरज नाही असा विचार अनेकांच्या मनात येतो. परंतु आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी थंडीतही पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर ग्लासभर पाणी प्यावे. कारण- रात्रभराच्या झोपेनंतर तुमचे शरीर थोडे डिहायड्रेट झालेले असते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होऊन, रक्तप्रवाह सुधारतो. चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते आणि हृदयाचे कार्यदेखील सुरळीत होण्यास मदत मिळते.

२. व्यायाम

या हवामानात पांघरुणामधून बाहेर पडूच नये, असे वाटत असते. परंतु, या मोहमयी विचारांवर मात करून, हलका व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही सोपे कवायतीचे प्रकार, चालणे, योगा यांसारखे व्यायाम करू शकता.

३. सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता हा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे सकाळचा आहार शक्य तितका पौष्टिक आणि पोटभरीचा असावा. त्यासाठी फळे, डाळी, ओट्स यांसारख्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.

हेही वाचा : कोरफडीसोबत ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी

४. ड जीवनसत्त्व

घरात सूर्यप्रकाश येत असल्यास सकाळी थोड्या वेळासाठी बाल्कनीमध्ये बसून कोवळे ऊन अंगावर घ्यावे किंवा सकाळी बाहेर चालायला गेल्यास तुम्हाला सूर्यकिरणांमधूनही भरपूर प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळेल. हे ड जीवनसत्त्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असून, हृदयासाठीदेखील महत्त्विचे असते.

५. तणाव

ताणतणावामुळेदेखील आपल्या आरोग्यावर, हृदयावर परिणाम होत असतो. त्यामुळे ध्यान, योगा आणि श्वासाचे व्यायाम करून मनावरील ताण कमी करण्यास मदत होते. सकाळी शारीरिक व्यायामानंतर काही मिनिटांसाठी मनावरील ताण कमी करणारेही व्यायाम करावेत.