ऋतूचक्रानुसार चार महिन्यांचा मान्सूनचा कालावधी संपत आला असताना पावसाने पुन्हा डोक वर काढलं आहे. अशात पावसाळ्यात होणाऱ्या आजारांनी सर्वजण त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात बऱ्याच जणांना डेंग्यु होतो. डेंग्यु झाल्यास शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. शरीरात सामान्य स्तितीत प्लेटलेट्सची संख्या १.५ लाख ते ४ लाख असते. व्हायरल ताप आल्यास देखील प्लेटलेट्सची संख्या कमी होते पण डेंग्यु झाल्यावर प्लेटलेट्सची संख्या २० ते ४० हजार इतकी कमी होते. त्यामुळे डेंग्यु झाला असेल तर किंवा सतत व्हायरल ताप येत असेल तर सतर्क राहत योग्य आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. कोणती आहेत अशी फळं आणि भाज्या जाणून घेऊया.

प्लेटलेट्सचे नैसर्गिक स्रोत

आणखी वाचा : झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की दिसेल फरक

अंडी
जर तुम्ही अंडी खात असाल तर प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी अंडी उत्तम उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी आढळते.

संत्री
संत्र्यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन सी आढळते. तुम्ही संत्र्याचा रस देखील पिऊ शकता. याशिवाय शेंगदाणे, राजमा आणि चवळी या पदार्थांमध्ये देखील फोलेट मुबलक प्रमाणात आढळते.

आयर्न
शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी आयर्न खूप आवश्यक असते. यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया मसूर आणि गुळ खाऊ शकता.

Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक प्लेटलेट ची संख्या वाढवण्यात मदत करते. प्लेटलेटची संख्या कमी असल्यास टोमॅटो, फ्लॉवर, ब्रोकोली, अननस आणि शिमला मिरची यांचाही आहारात समावेश करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)