Weight Loss Diet Plan: अतिवजनामुळे कोट्यवधी भारतीय त्रस्त आहेत. वजन वाढल्याने त्याला जोडून हृदयाचे विकार, डायबिटीज, किडनी संबंधित आजार अशा अनेक व्याधी डोकं वर काढू लागतात. यामुळे मग दर महिन्याला फिरायला जाण्यापेक्षा आपण डॉक्टरकडेच जास्त जाऊ लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सद्य घडीला जगभरात २०० कोटी हुन अधिक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. गांभीर्याची बाब म्हणजे यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. वजन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही असं नाही पण ते योग्य दिशेने न झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आपण आपल्या रोजच्या आहारात आपण निगेटिव्ह कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा कसा समावेश करू शकतो हे जाणून घेउयात.
सर्वात आधी निगेटिव्ह कॅलरीज म्हणजे काय हे पाहुयात, NDTV ने डॉ. अंजु सूद यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उच्च फायबरयुक्त पदार्थ तसेच ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यांना निगेटिव्ह कॅलरीयुक्त पदार्थ म्हणतात. उच्च फायबरयुक्त पदार्थ दोन उद्देश पूर्ण करतात. आपल्या शरीरातून फायबर बाहेर पडण्यास जास्त वेळ लागतो, त्यामुळे ते शरीरात राहतात आणि भूक लागण्यास विलंब करतात. आणि दुसरे म्हणजे, हे शून्य उष्मांक असलेले पदार्थ हळूहळू साखर शरीरात सोडतात आणि त्यामुळे त्याचे रुपांतर फॅट्समध्ये होण्याचे प्रमाण कमी असते.
निगेटिव्ह कॅलरी असणारे पदार्थ
१) वेबएमडीच्या माहितीनुसार, बेरी म्हणजेच ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा अगदी द्राक्ष- जांभूळ यांच्यात सामान्यतः ३२ कॅलरीज असतात. यांचा ग्लायसेमिक इंडेक्स काई व प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याचा समावेश निगेटिव्ह कॅलरीज पदार्थांमध्ये होतो. याशिवाय या फळांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
२) अलीकडे मशरूमची चव भारतीयांच्या पसंतीस उतरू लागली आहे, ही फळभाजी सूप किंवा भाजी किंवा अगदी पंजाबी टिक्का रूपात सुद्धा खाल्ली जाते. मशरूममध्ये फारफार तर १५ कॅलरीज असतात. यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण मुबलक असते. जर आपण दुग्धजन्य पदार्थांसह मशरूमचे सेवन केले तर कॅल्शियमचे पचन होण्यास मदत होते म्हणूनच चीज पिझ्झामध्ये अनेकजण मशरूमचा पर्याय आवर्जून निवडतात. मशरूममध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बीमुळे मन व शरीर आनंदी राहण्यास मदत होते.
३) १०० ग्रॅम गजरात ४१ कॅलरीज असतात. यातून शरीराला आवश्यक कोलेस्ट्रॉल व फॅट्स मिळतात. गाजर हे पोटॅशियम, मँगनीज, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन केचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीर सुदृढ व वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
हे ही वाचा<< खाऊन पिऊन वजन कमी करते TLC डाएट? जगभरातील तज्ज्ञांनी बनवलेला Diet Plan नीट पाहून घ्या
४) हेल्थलाईनच्या माहितीनुसार १०० ग्रॅम सफरचंदामध्ये ५० कॅलरीज असतात, व हे फळ फायबरचा साठा असते. जेवणानंतर साधारण ४ च्या सुमारास छोट्या भुकेला मिटवण्यासाठी सफरचंद खाणे उत्तम ठरेल. यामुळे डायबिटीज व कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. सफरचंदातील फायबरमुळे पॉट साफ न होण्याची समस्यां सुद्धा दूर होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)