जंक फूड आणि अतर चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे, तसेच अनियमित जवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढल्याचे दिसून येते. मधुमेह, हृदय विकार आणि दम्यामुळे मुले लठ्ठ होऊ शकतात. मात्र, चिंता न करता आहारामध्ये बदल करून, तसेच काही चांगल्या सवयी लावून मुलांचे लठ्ठ होणे कमी करता येऊ शकते.

१) पोष्टिक आहार देणे

मुलांच्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. सॉप्ट ड्रिंक, फास्ट फूड, चॉकलेट, तळलेले पदार्थ हे लठ्ठपणा वाढवतात. तसेच, बाजारातील अनेक पदार्थांमध्ये उच्च फॅट आणि साखर असते, जे वजन वाढवतात. त्यामुळे, असे पदार्थ मुलांना देणे टाळा. मुलांना फ्रोजन फूड, सॉल्टी स्नॅक आणि पॅकींग केलेले अन्न देण्याऐवजी खायसाठी फळे आणि भाज्या द्या.

(नैराश्य कमी करण्यात फायदेशीर ठरते सीताफळ, ‘या’ समस्यांपासून देते आराम)

२) कौटुंबिक क्रियाकलाप वाढवा

वजन घटवण्यासाठी क्रियाशील असणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने वजन कमी होऊ शकते. त्यामुळे, कौटुंबिक क्रियाकलापांना वाढवा. याने पूर्ण कुटुंब उत्साही राहील आणि कौटुंबिक बंध देखील मजबूत होईल. तसेच, पोहणे आणि सायकलींग मुलांना क्रियाशील ठेवते जे वजन घटवण्यात मदत करते.

३) मुलांचा स्क्रिन टाईम करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिकडे मुले संगणक, मोबाईलला अधिक वेळ देत असल्याचे दिसून येते. याने मुलांना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळत नाही, परिणामी लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच, अधिक स्क्रिन टाईममुळे डोळ्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे, मुलांचा स्क्रिन टाईम कमी करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या)