भाज्या शिजवण्यापासून पुरी तळण्याचे आणि भजी करण्यापर्यंत तेलाचा वापर सगळ्या गोष्टींमध्ये होतो. मोहरी, नारळ, शेंगदाणा, ऑलिव्ह तेल आणि सगळ्यात जास्त रिफाइंड तेल किंवा सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. परंतु तेल वापरण्याची ही एक पद्धत असते. जर आपण बऱ्याच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

आणखी वाचा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवत असाल तर हे नक्की वाचा

१. तेलाचे तापमान कसे तपासावे
काहीही तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करणे खूप महत्वाचे आहे. तेलाचे योग्य तापमान जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी तेलामध्ये भाजीचा एक छोटासा तुकडा टाकूण तपासा, तेलात जाताच भाजी तडतडत राहिली की समजून घ्या तेल व्यवस्थित गरम झाले आहे.

आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

२. तेलातून येणारा धूर टाळा
तेलातून धूर निघू लागला तर हे समजून घ्या की तेल जळतं आहे. अशा वेळी एकतर गॅस बंद करा आणि भाजीपाला तेलात टाका.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. थोड्या थोड्या गोष्टी फ्राय करा
एकाच वेळी अनेक गोष्टी तेलात टाकू नका. यामुळे तेलाचे तापमान हे पूर्णपणे कमी होते आणि आपण त्यात घातलेल्या गोष्टी अधिक प्रमाणात तेल शोषतात. त्यामुळे एका वेळी अनेक गोष्टी तळू नये.