Toilet cleaning hack: टॉयलेट स्वच्छ करणं हा प्रत्येकाच्या घरातील एक महत्त्वाचा आणि त्याचबरोबर कंटाळवाणा भाग! अनेक वेळा महागडे क्लिनर्स वापरूनही त्या पिवळसर डागांपासून सुटका मिळत नाही. पण, एका सामान्य गृहिणीने असा ‘जुगाड’ शोधून काढला आहे, ज्यामुळं केवळ काही सेकंदांत टॉयलेट होईल नव्यासारखं. चकाकी इतकी की, पाहणाऱ्याच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. विशेष म्हणजे तिनं टॉयलेटमध्ये टाकलं ते, जे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल… तेल! हो, केसांना लावायचं तेच तेल… पण का? आणि काय झाला परिणाम? पाहा व्हिडीओ आणि जाणून घ्या ही भन्नाट ट्रिक, जी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होतेय.

टॉयलेट स्वच्छ करायचं म्हणजे घरातील सर्वात मोठं आणि वेळखाऊ काम! कितीही महागडे क्लिनर वापरले तरी त्या पिवळसर डागांना काही इलाजच नसतो. सततच्या वापरामुळे टॉयलेटवर एक विशिष्ट प्रकारची घाण साचते, जी सामान्य साफसफाईने जात नाही. अशा वेळी आपणही कंटाळून जातो आणि टॉयलेट साफ करण्याची वेळ पुढे ढकलत राहतो. पण, आता एका स्मार्ट गृहिणीने असाच एक भन्नाट जुगाड दाखवला आहे, जो पाहून सोशल मीडियावर साऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

सामान्यतः टॉयलेट साफ करताना आपण हार्श क्लिनर, अ‍ॅसिड्स वापरतो. पण, या महिलेनं टॉयलेटमध्ये केसांना लावायचं तेल वापरलं. आणि हे तेल टाकल्यावर टॉयलेटमध्ये काय घडलं हे पाहून तुम्ही चकित व्हाल. टॉयलेट इतकं चमकलं की ते अक्षरशः नव्यासारखं वाटायला लागलं.

या व्हिडीओत संबंधित महिलेने आधी टॉयलेटमध्ये शॅम्पू टाकला. नंतर ब्रशने हलक्या हाताने टॉयलेट घासलं आणि दहा मिनिटांसाठी तसेच ठेवून दिलं. नंतर टॉयलेट पाण्याने धुवून टाकलं. आता आलं खास ट्विस्ट टॉयलेट सीट कोरडी झाल्यावर ती महिला टिश्यू पेपरने तेल लावते. आणि काय आश्चर्य तेलामुळे टॉयलेट सीटवर पाणी न थांबता सरकतं आणि टॉयलेटवर चिकट घाण साचत नाही, यामुळे दुर्गंधी दूर राहते आणि टॉयलेट कायम स्वच्छ आणि चमकदार दिसतं.

ही हटके टीप ‘Laxmi Majagahe’ या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आली आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

येथे पाहा व्हिडीओ

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)