Foods to Prevent Kidney Failure: थंडीचा हंगाम आरोग्यासाठी विशेष काळजीचा असतो. कारण- थंड हवामानामुळे शरीरावर अनेक आरोग्य समस्या हल्ला करतात. त्यातील सर्वांत संवेदनशील अवयव म्हणजे किडनी. शरीरातील रक्त स्वच्छ करणं, टॉक्सिन्स बाहेर काढणं व शरीरातील संतुलन राखणं एवढी सर्व महत्त्वाची कार्ये किडनी करीत असते. परंतु, किडनीवर एकदा परिणाम झाला, की अनेक आजारांचा धोका वाढतो. डॉ. निर्भय कुमार (रिजेन्सी हेल्थ कानपूर, नेफ्रॉलॉजी) म्हणतात, सर्दीच्या हंगामात काही सुपरफूड्सचे नियमित सेवन केल्यास किडनी हेल्दी आणि सक्रिय राहते, तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

किडनीसाठी लाभदायक सुपरफूड्स

१. बीट रूट

बीट रूट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्सने समृद्ध असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. बीट रूटमध्ये मोठ्या प्रमाणातील फायबर पचन सुधारते, शरीरातले टॉक्सिन्स कमी करते आणि किडनीला डिटॉक्स करण्यास मदत करते. सलाड, सूप किंवा थेट खाण्यासाठी बीट रूट उत्तम आहे. बीट रूटचे नियमित सेवन केल्यास किडनीची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरात रक्ताभिसरण नियंत्रित राहते.

२. क्रॅनबेरी (लाल बेरी किंवा आंबट बेरी)

क्रॅनबेरी किडनीसाठी वरदान आहे. हे मूत्रमार्गातील संसर्ग टाळण्यात मदत करते आणि हानिकारक जीवाणूंचा किडनीवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. तसेच, क्रॅनबेरी अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असते जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. क्रॅनबेरी ज्युस किंवा ताज्या क्रॅनबेरीचे सेवन केल्याने किडनीला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण मिळते.

३. लसूण

लसूण फक्त चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यात असलेला अॅलिसिन एक नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी आहे, जो रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो. त्यामुळे किडनीची कार्यक्षमता टिकवून ठेवता येते.
डॉ. आशुतोष सोनी (पारस उदयपूर, नेफ्रॉलॉजी) म्हणतात, “खाण्यात लसूण घालणे फक्त स्वाद वाढवत नाही, तर किडनीसह संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायी ठरते.”

सर्दीच्या हंगामात बीट रूट, क्रॅनबेरी व लसूण यांचा नियमित समावेश केल्यास किडनी सक्रिय राहते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. या सुपरफूड्समुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.

तज्ज्ञांचा सल्ला :

“आपल्या किडनीची काळजी घेणे म्हणजे शरीराच्या दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करणे. योग्य आहार, हायड्रेशन व सुपरफूड्सचा समावेश यामुळे किडनी सक्षम राहते.”