3 Easy Ways To Remove Rust From Iron Windows And Doors Home : पावसाळ्यात ओलाव्यामुळे अनेक वस्तू खराब होतात. याच विशेषत: लोखंडी वस्तूंना लगेच गंजू चढू लागतो. गंजलेल्या खिडक्या- दारं दिसायला तर खूप खराब दिसतातच शिवाय त्यांची मजबूती देखील कमी होते. त्यामुळे वेळीच दारं- खिडक्यांवरील गंज साफ करणं गरजेचे आहे, दरम्यान तुम्हालाही पावसाळ्यात लोखंडी दारं- खिडक्यांची गंजापासून काळजी घ्यायची असेल तर खालील काही सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.
पावसाळ्यात लोखंडी दरवाजे- खिडक्या कशा सुरक्षित ठेवायच्या?
१) पेंट आणि प्राइमर
लोखंडी दरवाजे आणि खिडक्या पावसापासून वाचवण्यासाठी पेंट आणि प्राइमरचा वापर करु शकता. यासाठी प्रथम गंज लागला दरवाजा, खिडकी पूर्णपणे स्वच्छ करा. जर दरवाजा- खिडक्यांना गंज असेल तर तो सँडपेपरने घासून स्वच्छ करा. यानंतर प्राइमरचे एक किंवा दोन कोट लावा आणि नंतर पेंट करा. प्राइमर सुकल्यानंतरच त्यावर एक किंवा दोन कोट पेंट करा. यामुळे पावसाळ्यात दरवाजे- खिडक्या गंजणार नाहीत.
२) दररोज स्वच्छ करा
पावसापासून दरवाजा- खिडक्यांचे गंजापासून संरक्षण करण्यासाठी नियमित स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे. मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे दरवाजा आणि खिडक्यांच्या कडांवर घाण आणि ओलावा जमा होतो. नंतर हळूहळू त्यांना गंज लागू लागतो. अशावेळी जर तुम्ही दररोज लोखंडी दरवाजे- खिडक्या कोरड्या कापडाने पुसल्यास गंजण्यापासून दूर ठेवू शकता.
३) मेणाचा वापर करा
दरवाजाच्या हँडल आणि कडांवर गंज लागण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी जर तुम्ही या ठिकाणी ग्रीस किंवा मेण लावला तर त्याचे गंजण्यापासून संरक्षण करु शकता. यामुळे लोखंडी दरवाजा- खिडक्या उघडताना आणि बंद करताना आवाजही येणार नाही.