How To Reduce Uric Acid Naturally: युरिक ॲसिड नाव साधं असलं तरी शरीरातील अनेक आजारांचं मूळ ठरू शकणारं ते ‘रासायनिक अपशिष्ट’ आहे. वैद्यकीयदृष्ट्या तो खादा आजार नसला तरी चुकीच्या जीवनशैली आणि असंतुलित आहार यांमुळे त्याचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू शरीरात ‘विष’ साचू लागतं.
आपल्या शरीरात ‘प्युरिन’ नावाचं घटक पदार्थ जेव्हा तुटतो, तेव्हा त्यातून युरिक ॲसिड तयार होतं. हे प्युरिन काही अन्नपदार्थांमध्ये विपुल प्रमाणात असतं; विशेषतः मांसाहार, सॉफ्ट ड्रिंक्स व जंक फूडमध्ये. साधारणपणे आपल्या मूत्रपिंडांद्वारे हे ॲसिड लघवीमार्गे बाहेर टाकलं जातं. पण जेव्हा त्याचं प्रमाण शरीरात जास्त वाढतं, तेव्हा मूत्रपिंडेही ते फिल्टर करू शकत नाहीत… आणि इथूनच सुरू होतो त्रासाचा खेळ.
हळूहळू हे युरिक ॲसिड शरीराच्या छोट्या सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात साचतं. परिणामी सांधे सुजतात, हाडांमधील जागा वाढते आणि हळूहळू हाडं कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे अंगात कडकपणा, सांधेदुखी, सूज व ‘गाऊट’सारखे त्रास निर्माण होतात. त्याहूनही धोकादायक म्हणजे युरिक ॲसिडचं वाढलेलं प्रमाण किडनीवरही प्रचंड दबाव आणतं. त्यामुळे वेळेत उपाय न केल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते. पण काळजी करू नका! तज्ज्ञ सांगतात की, औषधांवर अवलंबून न राहता, काही नैसर्गिक उपायांनी हे विषारी टॉक्सिन शरीरातून सहज बाहेर काढता येऊ शकतं.
नाश्त्याआधी प्या ‘हे’ जादुई पाणी
एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि घोट घोट करून प्या. हा साधा उपाय तुमच्या शरीरासाठी ‘नैसर्गिक डिटॉक्स’चं काम करतो. लिंबामधील व्हिटॅमिन सी किडनीला सक्रिय करतं, युरिक ॲसिडचे दुष्परिणाम कमी करतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान करतं. त्यामुळे केवळ सांधेदुखीच नाही, तर त्वचा आणि पचनावरही सकारात्मक परिणाम दिसतो.
दुसरा जादुई पर्याय ‘ॲपल सायडर व्हिनेगर’
जर लिंबूपाणी रोज प्यायचं नसेल, तर एक ग्लासभर पाण्यात दोन ते तीन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालून ते पेय प्यायचं. त्यात असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक शरीराचा pH संतुलन राखतात, सांध्यांमधील सूज कमी करतात आणि युरिक ॲसिडची निर्मिती रोखतात.
तज्ज्ञांच्या मते, हे दोन्ही उपाय जर काही दिवस नियमित केले, तर शरीरातील टॉक्सिन्स लघवीमार्गे बाहेर पडू लागतात आणि फक्त काही दिवसांतच फरक स्पष्ट जाणवतो.
म्हणजेच नाश्त्यापूर्वीचा एक ग्लास ‘योग्य पाणी’ तुमचं शरीर हलकं, स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकतं. पण खबरदार! हे उपाय सोपे असले तरी ते नियमितपणे करणं आवश्यक आहे. मग काही दिवसांतच परिणाम जाणवतील.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)