घरात स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते मग ते बाथरुम असो, टॉयलेट असो किंवा स्वयंपाक घर. स्वयंपाकघराची शक्य तितकी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न आपण करतो जेणेकरून झुरळ होऊ नये. कितीही स्वच्छता केली तरी झुरळ स्वयंपाक घरात दिसतातच. अशावेळी अनेक उपाय करावे लागतात. वारंवार सफाई करावी लागते. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू वापरण्यापूर्वी साफ करावी लागते. यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. झुरळ आणि मुंग्या होऊ नये म्हणून कितीही औषध वापरले तरीही पुन्हा काही काळाने झुरळ फिरताना दिसतातच. अशावेळी काय करावे हे समजत नाही. काळजी करू नका आम्ही तुमची मदत करणार आहोत. तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत जे वापरून तुमची या मोठ्या समस्येतून सुटका होईल.
तुम्हाला झुरळांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही स्वयंपाकघराची सफाई करताना तुमच्या बेसीनची सफाई देखील करावी लागेल. तुम्ही म्हणाल बेसीन तर स्वच्छ असते त्याला साफ करायचे पण ते साफ करणे अत्यंत आवश्यक आहे कारण बेसीनच्या पाईपमधून झुरळ स्वयंपाकघरात शिरू शकतात. त्यामुळे तुम्हाला बेसीनची सफाई करावी लागेल. त्यासाठी एक खास ट्रिक आम्ही सांगणार आहोत ही ट्रिक वापरल्यानंतर स्वयंपाक घरात झुरळांचा शिरकाव होणार नाही.
हेही वाचा – Kitchen Jugaad : गरम तव्यावर चहापावडर अन् मीठ टाकताच होईल कमाल! जाणून घ्या भन्नाट ट्रिक
रात्री झोपण्यापूर्वी बेसीन कसे साफ करावे?
- सर्व कामे झाल्यानंतर तुम्ही बेसीन साफ करू शकता.
- त्यासाठी तुम्हाला एक कांदा घ्या आणि अर्धा कापा
- त्यावर मीठ टाकून संपूर्ण बेसीन घासा.
- कांद्याचा रस सर्वत्र लागेल याची खात्री करा.
- कांद्याच्या वासामुळे झुरळ बेसीनमधून स्वयंपाकघरात शिरणार नाही.
- हा चिरलेला कांदा तुम्ही आठवडाभर वापरू शकता.
हेही वाचा – Video : सफाई करण्याआधी झाडूला मोजे घाला अन्….; ‘ही’ भन्नाट ट्रिक करेल कमाल
युट्युबवर Homemaker janvi नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही स्वत: वापरून ठरवा