Vasubaras 2025 Wishes In Marathi: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ हे गाणं तुमच्या अनेकांना आठवतं असेल. विशेषत: दिवाळी सणाच्या वेळी या गाण्याची अनेकांना आवठण होते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिचा सेवा केली जाते. असं म्हणतात की, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरा केला जाईल
ग्रामीण भागात शेतकरी गाय आणि वासरांचे पूजन करून वसुबारस साजरी करतात. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही त्यांना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा नक्की देऊ शकता. त्यानिमित्त तुमच्यासाठी खास वसुबारसच्या काही हटके शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! Vasubaras Wishes in Marathi
१) गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा, दे माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी.. वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा
२) स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा..
३) गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी, व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी! दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!
३) दारी सजले तुळशी वृंदावन, त्यासवे होई कामधेनूचे पूजन,
गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण, साजरा करूया वसुबारस हा सण
४) दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
५) गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो…
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

६) स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला… (Happy Vasubaras Wishes In Marathi
७) वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
८) राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
इडा पिडा ही टळावी दुःख-दारिद्र्य जळावे
सुख-समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा…!
९) शेतात राब राब राबणाऱ्या बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
१०) घरातलं पशुधन आणि दूधदुभतं कायम राहो…
औदार्य, प्रसन्नता आणि समृद्धी आपणास लाभो!
वसुबारसनिमित्त सर्वांन खूप शुभेच्छा!
‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा