करोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरु आहे. अनेक देशामधील कर्मचारी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत आहेत. त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र या व्हिडिओ कॉलिंगचा परिणाम आता मोबाइलच्या बिलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आधीच वीज बिलांमुळे आर्थिक फटका बसलेल्या सामान्यांचा फोन बिलांमुळे खिसा आणखीन हलका झाला आहे. व्हिडिओ कॉलमुळे बील वाढू नये शकते याची ग्राहकांना पूर्ण कल्पना देण्यात यावी यासंदर्भातील सूचना ट्राय म्हणजेच टेलिफोन रेग्युरेट्री अथोरिटी ऑफ इंडियाने केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतामध्ये सध्या जिओ मीट, एअरटेल ब्लू जिन्स, गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांकडून व्हिडिओ कॉलिंगची सेवा पुरवली जाते. मात्र व्हिडिओ कॉलिंगमुळे बील वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच यासंदर्भात ग्राहकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ कॉल करताना अनेकदा सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून आयएसडी म्हणजेच आंतरराष्ट्रीय कॉलच्या दराने पैसे आकारले जातात. मात्र यासंदर्भात सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना योग्य पद्धतीने माहिती दिली जात नाही. व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्म आणि अॅप्लिकेशनवरुन आंतरराष्ट्रीय क्रमांकावर कॉल केल्यास त्यावर आयएसडीच्या दराने शुल्क आकारले जाते. डायरल इनच्या माध्यमातून कॉल केल्यास आयएसडी शुल्क आकारण्यात येते. मात्र हे शुल्क आकारले जाऊ नये म्हणून हे अॅप्लिकेशनचा डेस्कटॉप व्हर्जन वापरण्याचा पर्याय वापरता येऊ शकतो. मात्र यामध्येही सेल्युलर नेटवर्कशी कनेक्टेड क्रमांकावरुन फोन केल्यास आंतरराष्ट्रीय तसेच प्रिमयम क्रमांकावरील कॉलसाठी आय़एसडी शुल्क आकारले जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video calling can attract isd charges what you should be careful about akp
First published on: 13-08-2020 at 17:11 IST