How To Clean Oil After Deep Frying: भारतीयांना तळलेले पदार्थ किती आवडतात हे काही वेगळं सांगायचं गरज नाही. वडे, भजी, पुऱ्या, पापड, कुरडया अगदी दह्यातली सुकवलेली मिरची इथपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण तळून खातो. मुळातच अति तेलकट खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम आपल्याला माहित आहेत. पण जर तुम्ही तळताना तेच तेच तेल वापरत असाल तर याचाही शरीरावर घातक प्रभाव पडू शकतो. एखादा पदार्थ (गोड /तिखट) जेव्हा आपण डीप फ्राय करतो म्हणजेच तळतो तेव्हा साहजिकच टाळून झाल्यावर तेल शिल्लक राहते. बरोबर? त्या पदार्थांचे उरलेले कण तेलात राहतात, तेल काळे पडते, किंचित करपते पण आता याचा अर्थ तुम्ही एकदा वापरलेले तेल फेकून द्यायचे का? अजिबात नाही, उलट तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून काळे पडलेले किंवा करपलेले तेल स्वच्छ करू शकता. आता हे काम नक्की करायचं कसं हे सांगण्यासाठी आम्ही आहोत ना! तर पाहूया..

तेल स्वच्छ करण्यासाठी येथे 5 टिप्स (5 Tips And Tricks To Clean The Cooking Oil)

१. जाळीदार कापडाने गाळून घ्या

अत्यंत बारीक जाळीदार कापडाने तुम्ही तेल गाळून घ्या. कापड खराब करायचे नसेल तर थोड्यावेळ तेल थंड होऊ द्या व मग चहाच्या गाळणीचा वापर करून तेल गाळून घेऊ शकते. तेलात तळलेले कोणतेही उरलेले तुकडे काढून टाका.

२. कॉर्न-स्टार्चचा वापर

तेल आणि कॉर्न-स्टार्च मिश्रण मंद आचेवर गरम करा, ते उकळू नये याची काळजी घ्या. सतत ढवळत राहा, कॉर्न-स्टार्च मिश्रण सुमारे 10 मिनिटांत घट्ट होते व तेलातील उर्वरित पदार्थांचे कण शोषून तेल स्वच्छ करते. मग हा स्टार्चचा गोळा बाजूला करून तेल गाळून घ्या.

३. लिंबू

तेल गरम करा. नंतर लिंबाचे छोटे तुकडे करून तेलात टाका. काळे उरलेले कण लिंबावर चिकटतील. मग ते बाहेर काढून तेल गाळून घेऊ शकता.

४. तेल जास्त प्रकाशात ठेवू नका

तेल आर्द्रता, प्रकाश आणि उष्णते पासून दूर ठेवा.

५. गॅसच्या शेगडीजवळ तेल ठेवू नका

तेल स्टोव्हपासून दूर ठेवा, यामुळे तेल उष्णतेच्या कमी संपर्कात येईल. त्याऐवजी, तुम्ही तेल फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ते कडक झाल्यावर वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वयंपाकाचे खराब झालेले तेल वापरणे आपल्या आरोग्यावर विविध वाईट परिणाम करू शकते. या तेलामध्ये ट्रान्स-फॅट अधिक असल्याने हेच तेल तुमचा रक्तदाब वाढवू शकते, शरीरात विषारी पदार्थ सोडू शकते व हृदयाला सुद्धा धोकादायक ठरते. त्यामुळे निदान वरील पद्धतीने तेल गाळून स्वच्छ करून मग वापरणे फायद्याचे ठरेल.