हिवाळ्यात थंडी वाढल्यामुळे हाता-पायाला मुंग्या येणे सामान्य बाब आहे. या ऋतूमध्ये रक्तवाहिन्या आकुंचित झाल्याने हात-पाय सुन्न होऊन मुंग्या येतात. मात्र असे वारंवार घडत असल्यास शरीरातील इतर अवयवांपर्यंत आक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना हाता-पायाला मुंग्या येण्याची समस्या वारंवार जाणवते. मात्र जर तुम्हाला मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल हे आजार नसतानाही हाता-पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्या शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते. असे दोन जीवनसत्त्व आहेत ज्यांची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास हाता-पायाला मुंग्या येण्याच्या समस्येमध्ये वाढ होऊ शकते. आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन ई हाता-पायाला येणाऱ्या मुंग्यांचे कारण ठरू शकते. या दोन जीवनसत्त्वांच्या कमातरतेमुळे हात आणि पायांमध्ये सतत वेदना जाणवून मुंग्या येतात. आज आपण जाणून घेऊया की व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन ई या समस्येसाठी कशाप्रकारे कारणीभूत ठरू शकतात आणि शरीरातील या जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो. हिवाळ्यात सांधेदुखीच्या वेदनेने हैराण आहात? आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश ठरेल रामबाण उपाय व्हिटॅमिन बी१२ शरीरामध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास आपल्याला थकवा जाणवू लागतो, पचन व्यवस्थित होत नाही आणि मळमळण्याची तक्रार जाणवते. तसेच, या महत्त्वाच्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आपल्या हाता-पायांला मुंग्याही येतात. शरीरातील व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही सप्लिमेंट्स वापरू शकता. आहारात अंडी, साल्मन फिश, चीज आणि दूध यांचा समावेश करून तुम्ही या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढू शकता. व्हिटॅमिन ई आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करून आपण या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढू शकतो. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी एवोकॅडो आणि बदाम खूप प्रभावी आहेत. सूर्यफुलाच्या बिया, सुकामेवा आणि शेंगदाणे यांचे सेवन केल्यानेदेखील व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण होते. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. न्यूमोनिया आजार ठरू शकतो मृत्यूचे कारण; जाणून घ्या प्रमुख लक्षणे आणि बचावाच्या पद्धती शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्याबरोबरच आपण खालील गोष्टींचीही बरदारी घेणे अतिशय आवश्यक आहे. हिवाळ्यात हात आणि पायांचे थंडीपासून संरक्षण करा.पायावर जोर देऊन खूप वेळ एकसारखेच बसू नका. बसण्याची स्थिती वेळोवेळी बदलत राहा.हात किंवा पाय दुमडून बसण्यात अडचण येत असेल तर ते सरळ ठेवा.हाताला मुंग्या आल्यास हाताची मूठ बंद करून उघडा. ही क्रिया काहीवेळ करत राहिल्यास रक्ताभिसरण सुरळीत होऊन मुंग्या येण्याचा त्रास कमी होईल.हिवाळ्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पायात मुंग्या येतात, अशा स्थितीत पायाची बोटे पुढे-मागे हलवा. घट्ट शूज घालू नका.