अन्य टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे व्होडाफोन-आयडिया अर्थात Vi कडेही आपल्या युजर्ससाठी अनेक Prepaid Plans आहेत. पण जर तुमचं काम दररोज 1 जीबी, 2 जीबी किंवा 3 जीबी डेटा प्लॅनद्वारे भागत नसेल तर आज आम्ही तुम्हाला दररोज 4 जीबी डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vi 299 Plan: 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्रिपेड प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 4 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा मिळतो.

Vi 449 Plan: 450 रुपयांच्या या प्लॅनमध्येही दररोज 4 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे, म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 224 जीबी डेटा मिळतो.

Vi 699 Plan: 700 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या प्लॅनमध्येही प्रतिदिन 4 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. म्हणजे युजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 336 जीबी डेटा मिळतो.

आणखी वाचा- Jio च्या ‘ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट’ला होणार सुरूवात; बक्षीस 12.50 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

अन्य फायदे : वरती दिलेल्या सर्व प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या तिन्ही प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरचा पर्यायही आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर म्हणजे सोमवार ते शुक्रवारदरम्यान न वापरलेला डेटा तुम्ही आठवड्याच्या अखेरीस वापरु शकतात. याशिवाय या तिन्ही प्लॅन्समध्ये Vi Movies आणि Vi TV या अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea vi offers 4gb daily data plans vi 299 plan vi 449 plan vi 699 plan ckeck details sas
First published on: 30-12-2020 at 16:17 IST