रात्री बाळ रडत असल्यास त्यास जवळ घेऊन केवळ पाच मिनिट चालल्याने बाळ शांत होऊ शकते, असे संशोधकांना आढळले आहे. जपानमधील आरआयकेईएन सेंटर फॉर ब्रेन सायन्सच्या कुमी कुरोडा यांच्या नेतृत्वाखाली करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आभ्यासानुसार ही माहिती आहे.

संशोधक विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात असलेले स्तनधारी प्राणी जसे श्वान, मांजर, माकड आणि प्राणी जे अपरिपक्वतेमुळे स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही, अशांचा आभ्यास करत होते. या दरम्यान त्यांना काही गोष्टी निदर्शनास आल्या. ज्या क्षणी प्राणी आपल्या पिलाला घेऊन चालतात त्या क्षणी ते शांत होतात आणि त्यांच्या हृदयाची गती कमी होते, असे संशोधकांना दिसून आले.

(आळसपणासह ‘या’ ६ सवयी वेळीच टाळा, अन्यथा मधुमेहाचा धोका वाढेल)

या आभ्यासातून जे निदर्शनास आले त्याची तुलना कुरोडो यांना इतर परिस्थितींशी करायची होती. या साठी त्यांनी २१ बाळांना चार विशिष्ट परिस्थितींमध्ये ठेवून आपल्या निष्कर्षांशी तुलना करून पाहिली. या परिस्थितींमध्ये आईने अर्भकांना घेऊन चालने, अर्भकांना घेऊन बसणे आणि लेटलेल्या अवस्थेचा समावेश होता.

यातून संशोधकांना दिसून आले की, जेव्हा आई आपल्या बाळाला घेऊन चालत होती तेव्हा बाळ शांत झाले आणि त्याच्या हृदयाची गती ३० सेकंदात कमी झाली. अशा प्रकराचे निष्कर्ष केवळ रॉकिंग कॉटमध्ये बाळ ठेवल्यावर दिसून आले, मात्र इतर परिस्थितींमध्ये ते दिसून आले नाही.

या प्रयोगातून असे कळले की केवळ बाळाला हातात धरून ठेवल्याने तो शांत होत नाही. त्यासाठी हालचाल करणे देखील गरजेचे आहे. याने मुलाचे ट्रान्स्पोर्ट रेसपॉन्स जागे होते. पुढे जेव्हा पाच मिनिटांकरीता चालने सुरू होते तेव्हा मजबूत प्रभाव दिसून आला. विशेष म्हणजे सर्व रडणारे बाळ शांत झालेत, त्यातील काही झोपले देखील.

(सकाळी उठताना करा ‘या’ क्रिया, लवकर जाग येईल, दिवसही चांगला जाऊ शकतो)

मात्र बाळांना परत त्यांच्या पलंगावर ठेवताना एक तृतियांशपेक्षा अधिक बाळ केवळ २० सेकंदात सावध झाले. संशोधकांनुसार सर्व बाळांनी शारीरिक प्रतिक्रिया दिल्या ज्यात हृदयाच्या गतीतील बदलावांचा देखील समावेश आहे ज्यामुळे मुले आईपासून वेगळे झाल्यास जागे होतात. मात्र, बाळाला झोपवण्यापूर्वी ते आधीच जास्त काळ झोपले असेल तर जागे होण्याची शक्यता कमी दिसून आली.

कुरोडा यांनी म्हणाल्या, चार मुलांची आई असतानाही परिणाम पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मला असे वाटले की बाळाचे जागे होणे हे त्याला बेडवर कसे ठेवले जाते, जसे त्याची मुद्रा किंवा हालचालीची सौम्यता याच्याशी संबंधित आहे. परंतु आमच्या प्रयोगांनी या सामान्य गृहितकांना समर्थन दिले नाही. कुरोडा यांच्या म्हणण्यानुसार, आई किंवा कोणत्याही काळजीवाहू व्यक्तीसाठी हे परिणाम सारखेच असू शकतात.

संशोधनाच्या आधारे, त्यांनी रडणाऱ्या नवजात बाळाला प्रभावीपणे शांत करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. रडणाऱ्या बाळाला धरून त्याच्याबरोबर पाच मिनिटे चालणे, त्यानंतर बाळाला झोपण्यापूर्वी आणखी पाच ते आठ मिनिटे बसन धरून ठेवणे, अशी ही पद्धत आहे.

(मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, फरक दिसून येईल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैज्ञानिक पद्धतींची चाचणी न घेता आम्ही पालकत्वाबाबत इतर लोकांचा सल्ला ऐकतो. परंतु, बाळाचे वर्तन समजून घेण्यासाठी आम्हाला विज्ञानाची आवश्यकता आहे. कारण ते आमच्या विचारापेक्षा खूपच जटिल आणि वैविध्यपूर्ण आहे, असे कुरोडा म्हणाल्या.