अनेकदा जेव्हा आपले वजन कमी होतं, तेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देता केवळ आपल्या व्यायामावर भर देतो. कारण आपल्याला वाटते की व्यायाम करून आपण आपले वजन वाढवू शकतो. परंतु तसं होत नाही. त्यासाठी आपल्याला उत्तम पद्धतीने आपल्या आहारात चांगल्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरोगी शरीरासाठी योग्य वजन असणे आवश्यक आहे. वजन वाढवणे आणि योग्य पद्धतीने वजन वाढणे या दोन्ही पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला काही प्रभावी उपाय करावे लागतील. तसेच दुसरीकडे, बाबा रामदेव यांच्यानुसार, दररोज सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि केळीचे सेवन केले पाहिजे. यामुळे जलद वजन वाढू शकते. चला जाणून घेऊया वजन वाढवण्यासाठी काही खास टिप्स-

डायट चार्ट

वजन वाढवण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय आणि कोणत्या वेळी आहार घेत आहात हे देखील खूप महत्वाचे आहे. तुमच्या डायट चार्टमध्ये वर्कआउटसह संतुलित आणि आरोग्यदायी आहाराचा समावेश करा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल.

अश्वगंधा आणि दूध

बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, दुधामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर अश्वगंधा पावडर दुधासोबत रोज घेतल्याने तुमचे वजन वाढू शकते.

पांढऱ्या केसांची चिंता सतावत असेल, तर तुमच्या स्वयंपाकघरातील ‘हा’ रामबाण उपाय करून पाहा

सोयाबीन

सोयाबीन हे प्रथिने मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि त्याचे प्रोटीन पेय योग्य पद्धतीने वजन वाढवण्यास मदत करू शकते. हे प्रथिने चरबी न वाढवता वजन वाढवण्यास मदत करत असल्याने हे आहारात समावेश करण्याचा एक उत्तम उपाय आहे.

अंडी

वजन वाढवण्यासाठी अंडी देखील एक उत्तम पदार्थ आहे. अंड्याचा पांढरा गर हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे आणि तुमचे वजन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतो.

हिरव्या भाज्या

तुमच्या आहारात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. कारण हिरव्या भाज्या केवळ वजन वाढवण्यास मदत करत नाहीत तर त्या शरीराला प्रचंड ऊर्जा देतात. त्याच वेळी व्हेजिटेबल प्रोटीन ड्रिंक तुमच्या वजनात खूप मदत करू शकते. याशिवाय त्याची खासियत म्हणजे इतर प्रथिनांच्या तुलनेत ते लवकर पचते.

तज्ज्ञांच्या मते वजन वाढवण्यासाठी एक साधा नियम आहे. तुम्ही कॅलरी बर्न करण्यापेक्षा जास्त कॅलरी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही जिममध्ये जात असाल तर फक्त तुमच्या प्रशिक्षकांवर अवलंबून राहू नका. एक व्यावसायिक पोषणतज्ञ तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो, म्हणून त्याच्याशी सल्लामसलत करणे चांगले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight gain these foods can be effective in increasing weight include them in your diet today scsm
First published on: 22-02-2022 at 11:54 IST