How to improve leg strength naturally : साधारणपणे ३० ते ४० वयोवर्षात आपल्या शरीरात शरीरात सुद्धा बदल होत असतात. त्यामुळे शरीराची व्हिटॅमिन डी३ (कोलेकॅल्सीफेरॉल) तयार करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्वचा हलकी होणे, सूर्यप्रकाशाचा कमी राहणे, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे हे बदल शरीरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेसाठी जबाबदार असतात. शरीरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेचा सर्वात मोठा परिणाम आपल्या हाडांवर होतो. व्हिटॅमिन डी३ च्या कमतरतेमुळे, शरीर कॅल्शियम योग्यरित्या शोषू शकत नाही.

या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत, ठिसूळ होतात; ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस, ऑस्टियोमॅलेशिया सारख्या आजारांचा धोका वाढतो. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे गुडघे, पाय दुखणे, अशक्तपणा, शरीर कडक होते आणि स्नायूंची ताकद देखील कमी होते.

पण, जर तुम्हाला वारंवार चालताना अडखळल्यासारखं वाटतं असेल तर तुमच्या पायांमध्ये सुन्नपणा, अशक्त, मुंग्या येणे आणि थकवा जाणवत असेल; तर शरीरात व्हिटॅमिन डी३, बी१२ आणि बी१ ची कमतरता हेच कारण असू शकते. एम्स आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, पायांमध्ये ही समस्या वृद्धत्वामुळे नाही तर सारकोपेनियामुळे आहे. सारकोपेनिया शरीराला वेळेआधी कमकुवत करते. या समस्येमुळे, पाय दुखणे, सूज येणे, अशक्तपणा आणि पडण्याची भीती वाटते.

तर शरीरात व्हिटॅमिन डी२, बी१२ आणि बी१ ची कमतरता पूर्ण करणारे तीन जीवनसत्त्वे असतात; तर त्याचा आहारात तुम्ही समावेश केलात तर कदाचित ही समस्या उद्भवणार नाही.

व्हिटॅमिन डी३ – व्हिटॅमिन डी३ हाडांना कॅल्शियम पुरवते, स्नायूंचे आकुंचन सुधारते आणि मेंदूला संदेश पाठवण्याची नसांची क्षमता वाढवते. नाश्त्यानंतर दररोज ८०० ते २००० IU दूध, दही, अंडी किंवा तूप घेतल्याने पायांमधील कमकुवतपणा, सुन्नपणा कमी होतो. व्हिटॅमिन डी३ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, अंड्याचा पिवळा भाग, चरबीयुक्त मासे, कॉड लिव्हर ऑइल, चिकन आणि मटणाचे लिव्हर, फोर्टिफाइड दूध, दही, तृणधान्ये आणि संत्र्याचा रस, तृणधान्ये आणि डी३ असणारे पेय मशरूम, तूप आणि बटर देखील तुम्ही खाऊ शकता.

व्हिटॅमिन बी१२ – व्हिटॅमिन बी१२ हे शरीराच्या संतुलनाचे आणि नसांचे रक्षण करतात. वयानुसार, शरीरात बी१२ चे शोषण कमी होते. कारण – पोटातील आम्ल कमी होऊ लागते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पायांना मुंग्या येणे, पाय सुन्न होणे, चालताना अडखळणे, संतुलन बिघडणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांमध्ये बी१२ ची कमतरता होती; त्यांना चालताना अचानक तोल जाण्याची किंवा पडण्याची शक्यता दुप्पट असते. नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात ५०० ते १००० मायक्रोग्रॅमचा आहारात समावेश. अंडी, मासे, दूध आणि मांसामध्ये व्हिटॅमिन बी१२ भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन सर्व प्राण्यांवर आधारित अन्नांमध्ये मुबलक प्रमाणात असते.

व्हिटॅमिन बी१ – व्हिटॅमिन बी१ म्हणजेच थायमिन हे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व असतात; जे स्नायूंच्या उर्जेचे इंजिन आहे. व्हिटॅमिन बी१ ला व्हिटॅमिन बोन असेही म्हणतात. कारण यामुळे स्नायूंना हालचाल करण्यास शक्ती मिळते. त्यांच्या कमतरतेमुळे पायांमध्ये थकवा येतो, शरीरात आळस येतो, पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होतो, स्नायूंमध्ये कडकपणा येतो. टोकियो विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्यांना बी१ ची कमतरता असते ते अगदी हळूहळू चालतात, त्यांना पायऱ्या चढायला त्रास होतो. सकाळच्या नाश्त्यात दररोज ५० ते १०० मिलीग्राम अंडी, दही किंवा मूग डाळीचे तुम्ही सेवन केल्यास शरीराला डी३ आणि बी१ घ्या मिळेल; ज्यामुळे तुमचे पाय मजबूत होतील.