Workout tips: अनेकांसाठी त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून ३० मिनिटांचा वेळ काढणंही कठीण असू शकतं. यामुळेच Microdosing व्यायामाचा विकास झाला आहे, याचाच अर्थ लोक थोड्या थोड्या वेळासाठी व्यायाम करतात. पण असं का केलं जातं? तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूड किंवा कार्यक्षमता सुधारण्यासाठी केला जाणारा व्यायाम. तुम्ही जर ३० मिनिटांच्या धावण्यासाठी वेळ काढू शकत नसाल, तर कमी वेळच्या व्यायामाचा तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का हे जाणून घेऊ…

व्यायाम म्हणजे केवळ जिममध्ये जाऊन केलेले काही निवडक व्यायाम प्रकार नव्हे. दिवसभरात तुम्ही जो आहार घेता, त्यानुसार तुमची शारीरिक हालचालही तेवढीच महत्त्वपूर्ण असते. त्या अनुषंगाने तुम्ही काही ना काही शारीरिक व्यायाम केल्यास किंवा योगा तसंच शारीरिक हालचाल होणारे काही खेळ खेळल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढांनी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे किंवा ७५ मिनिटे जास्त तीव्रतेचा व्यायाम. हे शक्य नसेल तर तुम्ही काय कराल? जलद चालणे, सायकलिंग, धावणे, पोहणे किंवा फुटबॉल, बास्केटबॉल अशा खेळांचाही पर्याय आहेच. हे शक्य नसेल तर तुम्ही काय कराल? त्यासाठीच आहे हे मायक्रोडोसिंग. अशावेळी काही मिनिटांचा तीव्र व्यायाम तुम्हाला दिवसभर ऊर्जेने भरपूर राहण्यास मदत करेल. अगदी ३ ते ४ मिनिटांचा व्यायाम वेगवेगळ्या सत्रात केल्यास फायदेशीर ठरू शकतो.

Microdosingमध्ये व्यायाम म्हणून काय करू शकतो?

अनियोजित किंवा दररोजच्या हालचाली, म्हणजे मुलांसोबत खेळणे किंवा बस स्टॉपवर चालणे. यामध्ये घरकामही महत्त्वाचे ठरू शकते. लादी पुसणे, साफसफाई करणे हेदेखील शारीरिकदृष्ट्या गरजेचे आहे.

याचा फायदा कसा होतो?

लहान सत्रात व्यायाम केल्याने ह्रदय आणि फुप्फुसांचे आरोग्य आणि रक्तदाब यात तेवढीच सुधारणा होते जितकी एका दीर्घ व्यायाम सत्रामुळे होते. अशाप्रकारच्या व्यायामामुळे वजन कमी होणे आणि कोलेस्टेरॉल कमी होणे हे काही अभ्यासांमधून दिसून आले आहे. या व्यायामांचा कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.