भारताला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. जगातील सर्व मधुमेह रुग्णांपैकी १७ टक्के भारतीय आहेत. भारतात ८० दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १३५ दशलक्षपर्यंत वाढण्याची भीती आहे. मधुमेहाचा थेट संबंध साखरेशी आहे. अशा परिस्थितीत, उच्च रक्तातील साखर (High blood sugar) असलेल्या सर्व लोकांना मधुमेह आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तातील साखर आणि मधुमेह यांच्यातील संबंध आणि फरक समजून घेऊया..

उच्च रक्तातील साखर म्हणजे काय? (What Is High Blood Sugar)

उच्च रक्तातील साखरेला हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. मधुमेह असलेल्या लोकांवर याचा अधिक परिणाम होतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते तेव्हा त्याला उच्च रक्त शर्करा म्हणतात (High Blood Sugar). मात्र खरा प्रश्न असा आहे रक्तातील साखरेचे प्रमाण किती जास्त असल्याने ती उच्च रक्तातील साखर मानली जाते.?

Ayurveda for Diabetes
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या 
When blood sugar level becomes high or low know the reason and its symptoms
ब्लड शुगर कमी किंवा जास्त कधी होते? याची लक्षणं कोणती? जाणून घ्या
Diabetes Patients
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही खाऊ नये ‘हे’ पदार्थ; वाढू शकते ब्लड शुगर 
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

डॉक्टरांच्या मते, दररोज १५० ग्रॅमपेक्षा जास्त फ्रक्टोज सेवन केल्यास शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होऊ शकतो. हा उच्च रक्तातील साखरेचा टप्पा मानला जाऊ शकतो. अन्न आणि शारीरिक हालचालींसह उच्च रक्तातील साखरेची अनेक कारणे असू शकतात.

( हे ही वाचा: आतड्यांना खराब करू शकतात ‘हे’ १० पदार्थ; आजपासूनच खाणे टाळा!)

रक्तातील साखरेची चाचणी कशी केली जाते?

उच्च रक्तातील साखर तपासण्यासाठी HbA1c चाचणीची मदत घेतली जाते. याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकोहेमोग्लोबिन चाचणी असेही म्हणतात. ही मुख्यतः हिमोग्लोबिन चाचणी आहे. ही चाचणी साखरेच्या पातळीतील चढ-उतारांची माहिती देते. म्हणजेच रक्तातील साखरेच्या पातळीतील बदलांची आकडेवारी याद्वारे मिळते. या चाचणीचा मिळणारा निकाल हा टक्केवारीत मोजला जातो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने, निरोगी लोक दोन वर्षांतून एकदा आणि मधुमेहाचे रुग्ण दर तीन महिन्यांनी करा. HbA1c चाचणीमध्ये एकदा किंवा दोनदा साखरेची उच्च पातळी पाहणे म्हणजे मधुमेह आहे असे नाही. चला तर मग जाणून घ्या HbA1c चाचणीमध्ये A1C पातळी किती असणे सामान्य आहे.

सामान्य 5.7% पेक्षा कमी
प्री- डायबिटीक 5.7% ते ६.४% दरम्यान
डायबिटीक ६.५% आणि त्याहून अधिक

( हे ही वाचा: कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

तुमच्या वयानुसार रक्तातील साखर किती असली पाहिजे?

८० ते १८० mg/dl फास्टिंग ब्लड शुगर ७-१२वर्षे वयोगटात नाश्त्यापूर्वी म्हणजे रिकाम्या पोटी सामान्य मानली जाते. दुसरीकडे, दुपारच्या जेवणानंतर रक्तातील साखर १४० mg/dl पर्यंत असणे सामान्य मानले जाते. रात्रीच्या जेवणानंतर, जर रक्तातील साखर १०० ते १८०mg/dl च्या मर्यादेत राहिली तर ती सामान्य मानली जाते.

वयवेळसामान्य ब्लड शुगर
१३ ते १९ रिकाम्या पोटी70 ते 150 mg/dL 
१३ ते १९ दुपारी जेवल्यानंतर 140 mg/dL
१३ ते १९ रात्री जेवल्यानंतर  90 ते 150 mg/dL
२० ते २६ रिकाम्या पोटी100 ते 180 mg/dL
२० ते २६ दुपारी जेवल्यानंतर 180 mg/dL
२० ते २६ रात्री जेवल्यानंतर 100 ते 140 mg/dL 
२७ ते ३२ रिकाम्या पोटी100 mg/dL
२७ ते ३२दुपारी जेवल्यानंतर90-110 mg/dL
२७ ते ३२रात्री जेवल्यानंतर 100 ते 140 mg/dL
३३ ते ४०रिकाम्या पोटी140 mg/dL
३३ ते ४०दुपारी जेवल्यानंतर160 mg/dL
३३ ते ४०रात्री जेवल्यानंतर 90 ते 150 mg/dL 
५० ते ६० रिकाम्या पोटी90 ते 130 mg/dL
५० ते ६० दुपारी जेवल्यानंतर140 mg/dL
५० ते ६० रात्री जेवल्यानंतर 150 mg/dL 

( हे ही वाचा : हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)

मधुमेह कसा होतो?

रक्तातील साखरेचे प्रमाण शोषून घेता येत नसल्याची स्थिती मधुमेहाला जन्म देते. जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात एक रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्या अंतर्गत कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये विभाजन होते. या प्रक्रियेतून इन्सुलिन सोडले जाते. तो एक संप्रेरक आहे. इन्सुलिन पेशींना ग्लुकोज घेण्यास सांगतात. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन थांबते, तेव्हा शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेलच की मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते.