सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र कालांतराने आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. बहुतेक लोकांना यामुळे रक्तदाबाची समस्या भेडसावते. सामान्य रक्तदाब आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य दर्शवितो. मात्र यामध्ये संतुलन राखले नाही तर आपल्याला अनेक आजार घेरू शकतात. आजकाल सर्वच लोकांना रक्तदाबाची समस्या उद्भवत असली, तरीही पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार रक्तदाबाची पातळी वेगवेगळी असते. आज आपण विशिष्ट वयामध्ये पुरुषांचा रक्तदाब किती असावा हे जाणून घेऊया.

सिस्टोलिक आणि डायस्टोलिक या दोन प्रकारे रक्तदाब मोजला जातो. सामान्य भाषेत आपण याला अप्पर ब्लडप्रेशर आणि लोअर ब्लडप्रेशर म्हणतो. सिस्टोलिक म्हणजे बीपी मोजताना जी सर्वात जास्त संख्या असते आणि डायस्टोलिक जी संख्या कमी असते. उदाहरणार्थ, १२०/८० यामध्ये १२० सिस्टोलिक आहे, तर ८० डायस्टोलिक. रक्तदाब शोधण्याचा हा मार्ग आहे. १२०/८० मिमी एचजी हा सामान्य रक्तदाब योग्य मानला जात असला तरी तो वयानुसार बदलतो.

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयोमानानुसार पुरुषांचा रक्तदाब किती असावा?

  • १८ ते ३९ वयोगटातील पुरुषांसाठी रक्तदाबाची सामान्य पातळी – ११९/७० मिमी एचजी
  • ४० ते ५९ वयोगटातील पुरुषांसाठी रक्तदाबाची सामान्य पातळी – १२४/७७ मिमी एचजी
  • ६० आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठी रक्तदाबाची सामान्य पातळी – १३३/६९ मिमी एचजी

वयोमानानुसार तुमचा रक्तदाब सतत जास्त किंवा कमी होत असेल तर त्यांतुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.