scorecardresearch

Premium

Food Stuck in Throat: जेवताना तुमचाही घशात अचानक अन्न अडकते का? परिस्थिती गंभीर होण्याआधी लगेच करा ‘या’ ४ गोष्टी

जेवताना घशात अन्न अडकले असेल तर पाणी प्यावे, लवकर आराम मिळेल.

food stuck in throat
फोटो(freepik)

काहीवेळा अन्न खाताना घशात अडकणे सामान्य गोष्ट नसते. जेंव्हा आपण काही खातो तेंव्हा तोंडातून पोटापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ५० पेक्षा जास्त स्नायू आणि अनेक नसा एकत्र काम करतात. जेव्हा तुम्ही सॉलिड पदार्थ खाता तेव्हा तीन टप्यांमध्ये प्रक्रिया सुरू होते. तुम्ही अन्न चावून गिळण्यासाठी तयार करता. या प्रक्रियेमुळे अन्न लाळेमध्ये मिसळते, ज्यामुळे अन्न ओलसर प्युरीमध्ये बदलते. जेव्हा तुमची जीभ अन्न तुमच्या घशाच्या मागच्या बाजूला ढकलते, तेव्हा तुमची गिळण्याची प्रक्रिया सुरू होते. या दरम्यान, तुमची श्वासनलिका घट्ट बंद होते आणि तुमचा श्वास थांबतो.

अन्ननलिकेत अन्न अडकले की लगेच लक्षणे दिसू लागतात. छातीत दुखणे, जास्त लाळ गळणे, सतत खोकला येणे, खोकताना चेहऱ्याचा रंग फिका पडणे, काही प्रकरणांमध्ये चक्कर येणे देखील असू शकते. जर अन्न घशात अडकले असेल आणि कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसतील, तर घशात अडकलेले अन्न तुम्ही सहज गिळू शकता.

tea in weight loss diet is it necessary to quit chai on your fat loss journey know from dietician
चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास वजन होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा
Raj Thackeray And lata Mangeshkar
राज ठाकरेंनी लता मंगेशकरांशी बोलणं का सोडलं होतं? काय होता तो किस्सा?
PM Narendra Modi at Ayodhya
अयोध्येतून येताच पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय; “एक कोटी घरांवर…”
no alt text set
कशासाठी? पोटासाठी! : अन्ननलिकेचा कर्करोग

( हे ही वाचा: दुधासोबत ‘या’ एका गोष्टीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात ५ आश्चर्यकारिक फायदे; जाणून घ्या याचे सेवन कसे करावे)

परिस्थिती कोणत्यावेळी गंभीर होऊ शकते

 • जेव्हा अन्न अडकल्यामुळे बोलता येत नाही
 • श्वास घेण्यास त्रास होणे
 • जोरदार श्वास घेणे
 • श्वास घेताना कर्कश आवाज येणे
 • खोकला येणे
 • जेव्हा चेहरा पिवळा किंवा निळा पडणे
 • चक्कर आल्यास स्थिती गंभीर होऊ शकते.

( हे ही वाचा: Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा)

घशात अडकलेले अन्न काढण्यासाठी उपाय

 • अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की कोक किंवा इतर कार्बोनेटेड पेये प्यायल्याने अन्ननलिकेमध्ये अडकलेले अन्न काढून टाकण्यास मदत होते. डॉक्टर अनेकदा अडकलेले अन्न काढण्यासाठी हे सोपे तंत्र वापरतात.
 • गॅसच्या समस्येवर उपचार करणारी औषधे अन्ननलिकेमध्ये अडकलेले अन्न काढून टाकण्यास मदत करू शकतात. ही औषधे अन्ननलिकेमध्ये दाब वाढवतात आणि त्यामुळे अन्न सहज निघते.

( हे ही वाचा: त्वचेसंबंधित समस्येपासून सुटका हवी असल्यास ‘या’ फळांच्या साली चुकूनही फेकून देऊ नका; चेहऱ्यावर करा अशाप्रकारे वापर)

 • जास्त पाणी प्या. पाण्याचे काही मोठे घोट तुमच्या अन्न नलिकेमध्ये अडकलेले अन्न खाली ढकलण्यास मदत करतील. वारंवार पाणी प्यायल्याने अडकलेले अन्न ओले होऊ शकते आणि सहज खाली उतरू शकते.
 • काहीवेळा अन्न नलिकेला अतिरिक्त ग्रीसची गरज असते, त्यामुळे एक चमचा लोणी खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. एक चमचा लोणी अन्ननलिका ओलावण्यास मदत करते आणि अडकलेले अन्न पोटात जाण्यास सोपे करते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What tou can try when food stuck in throat know the ways gps

First published on: 25-10-2022 at 22:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×