बदलत्या जीवनशैलीचा परिणाम सर्वात जास्त आरोग्यावर होत आहे. रोजचे धावपळीचे रुटीन, तणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेसा व्यायाम न करणे यांसारख्या सवयीमुळे कमी वयात अनेक आजरांना आमंत्रण मिळते, तसेच याचा शरीराच्या बाह्यरूपावरही परिणाम झालेला दिसून येतो. पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांचे कमी वयात केस गळू लागतात आणि टक्कल पडू लागते. या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. रोजच्या काही सवयी केसगळतीला कारणीभूत ठरतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.

केसगळतीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या सवयी:

टाळू नीट स्वच्छ न करणे
केस धुताना अनेकदा घाईत वरवर केस धुतले जातात. पुरुषांमध्ये केस स्वच्छ न धुण्याचे प्रमाण जास्त आढळते त्यामुळे टाळू नीट स्वच्छ होत नाही आणि त्यावर कोंडा जमा होतो. टाळूवर कोंडा जमा झाल्यास ती अधिक कोरडी होते, तसेच त्यावर तेलकटपणा जाणवतो. यामुळे केस गळू लागतात.

आणखी वाचा: तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून लगेच मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

रोज केस धुणे
सहसा पुरुषांना रोज केस धुण्याची सवय असते. याचाच अर्थ रोज केसांवर शॅम्पू किंवा साबणाचा वापर केला जातो. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. यामुळे रोज केस धुणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टायलिंग प्रोडक्ट्स
पुरुषांमध्ये केसांसाठी स्टायलिंग प्रोडक्टस वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईल करण्यासाठी स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो, ज्यामुळे केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच यातील केमिकल्समुळे टाळूवर धुळ जमा होण्याचे प्रमाण वाढते ज्यामुळे केस कमकुवत होऊन केस गळती होऊ शकते.