How to clean White Clothes: आजकाल सोशल मीडियावर एक नवा घरगुती उपाय खूप वायरल होत आहे. यात लोक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना डिस्प्रिनची गोळी टाकत आहेत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण असा दावा केला जातो की त्यामुळे कपडे अधिक चमकदार, मऊ होतात आणि कपड्यांवरील डाग निघून जातात.
इंटरनेटवर अनेक लोक व्हिडिओ आणि रील्समध्ये दाखवत आहेत की ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे आणि डिटर्जंटसोबत १-२ डिस्प्रिनच्या गोळ्या टाकतात. त्यांचं म्हणणं आहे की या पद्धतीने जुने कपडेही नव्यासारखे दिसू लागतात. डिस्प्रिनमधील काही घटक कपड्यांवरील घाण आणि घामाची दुर्गंधी काढून टाकायला मदत करतात.
डिस्प्रिनमध्ये असे काय आहे जे ते प्रभावी बनवते? (Disprin Tablet in Washing Machine)
असं सांगितलं जातंय की डिस्प्रिनमध्ये एस्पिरिन (Aspirin) नावाचं केमिकल असतं, ज्यात हलकं आम्ल (acid) असतं. हे आम्ल कपड्यांवरील डाग हलके करण्यास आणि पिवळसरपणा कमी करण्यास मदत करतं. काही लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळे पांढरे कपडे अजून स्वच्छ आणि चमकदार दिसतात.
लोक ते कसे वापरत आहेत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं की, त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी कपडे धुताना सांगितलं की पांढऱ्या कपड्यांसोबत २ ते ३ एस्प्रिनच्या गोळ्या वॉशिंग मशीनमध्ये टाक, कारण त्यांची आईही असंच करत असे. त्यांचं म्हणणं आहे की एस्प्रिन म्हणजेच डिस्प्रिनचा वापर पांढरे कपडे चमकदार बनवण्यासाठी आणि डाग काढण्यासाठी मदत करतो.
हे कपड्यांच्या फायबरमध्ये जमा झालेली घाण काढायला मदत करतं, त्यामुळे कपडे पुन्हा स्वच्छ आणि ताजेतवाने दिसतात. जर तुम्हाला तुमचे पांढरे कपडे जास्त दिवस नव्यासारखे ठेवायचे असतील, तर धुण्याच्या वेळी त्यात एस्प्रिन टाकून धुवू शकता. हा एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
कसा कराल वापर…
ही ट्रिक करण्यासाठी २-३ डिस्प्रिनच्या गोळ्यांची पावडर करून कोमट पाण्यात विरघळवली जाते. मग हे पाणी वॉशिंग मशीनमध्ये टाकलं जातं आणि सोबत डिटर्जंटही घातलं जातं. काही लोक डिटर्जंट पावडरमध्ये मिसळून थेट मशीनमध्ये टाकतात. त्यांचा दावा आहे की त्यामुळे कपडे पांढरेशुभ्र होतात आणि दुर्गंधीही निघून जाते.
ही पद्धत खरोखर काम करते का?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की एस्प्रिनमध्ये असलेलं आम्ल (acid) काही प्रमाणात पांढऱ्या कपड्यांवरील डाग हलके करू शकतं, पण हे कपडे धुण्याचं योग्य सोल्यूशन नाही. जर कपडे रंगीत असतील किंवा नाजूक कापडाचे असतील, तर ही पद्धत त्यांना नुकसान पोहोचवू शकते. आम्लयुक्त केमिकल्समुळे कापडाचे फायबर कमजोर होऊ शकतात आणि त्यामुळे कपडे लवकर खराब होऊ शकतात.
आजकाल सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक घरगुती उपाय वायरल होतात. लोक त्याबद्दल नीट माहिती नसतानाही ते करून पाहतात. कधी कधी याचा फायदा होतो, पण नुकसान होण्याची शक्यताही असते.