केसांना नैसर्गिक काळा रंग मिळावा, यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे यामुळे कोणते दुष्परिणाम होणार नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा व तुळस हा रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. तसेच आवळ्या यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, कॅरोटिन, व्हिटॅमिन बी, फायबर आणि कित्येक औषधी तत्त्वांचा समावेश आहे. हे घटक केसांसाठी वरदान आहेत. आजकाल अनेकांना नैसर्गिक मार्गाने केस काळे करायचे असतात. तर अशा लोकांसाठी तुळशी आणि आवळ्याचा नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत. या दोन्हींचा वापर करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पांढरे होणारे केस काळे करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तुळशी आणि आवळा यांच्या मदतीने पांढरे केस कसे काळे करू शकतात.

आवळा आणि तुळशीची अशी बनवा पेस्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुळस आणि आवळा देखील पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तुळस बारीक करून त्यात आवळा पावडर मिसळा आणि थोड्या पाण्यात भिजवून रात्रभर असेच ठेवा. सकाळी आंघोळ करताना तुळस आणि आवळ्याची पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर केस धुवा. लवकरच तुमचे केस काळे होऊ लागतील. तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुळस आणि आवळ्याचे मिश्रण काही महिने वापरणे फायदेशीर ठरू शकते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

केसांना चमकदार करण्यासाठी आवळा आहे फायदेशीर

केसांना चमकदार करण्यासाठी तुम्ही आवळा वापरू शकता. आवळ्याच्या रसाने चांगली मसाज करा. यानंतर तासाभरानंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येईल.