How to keep chapati soft: अनेकदा पोळी बनवताना झालेल्या चुकांमुळे पोळी कडक होते, त्यामुळे कडक पोळी खायला सर्व जण नकार देतात. अशा परिस्थितीत मऊ, लुसलुशीत पोळी कशी बनवायची हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. याशिवाय, पोळी दीर्घकाळ मऊ कशी ठेवायची हे देखील जाणून घेतले पाहिजे.

पोळी कडक का होते?

(फोटो सौजन्य: Freepik)
  • पोळी कडक होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात योग्य प्रमाणात पाणी न घालणे आणि नीट मळून न येणे हे आहे.
  • तसेच दुसरे कारण म्हणजे योग्य पद्धतीने पोळी लाटली जात नाही, ज्यामुळे पोळी काही ठिकाणी घट्ट होते आणि इतर ठिकाणी खूप पातळ होते.
  • तिसरी चूक म्हणजे तव्यावर पोळी व्यवस्थित भाजली पाहिजे आणि त्यासाठी गॅस एकाच आचेवर असायला हवा.
  • पोळी कधीही मंद किंवा खूप जास्त आचेवर भाजू नका. त्यामुळे पोळी नीट भाजली जात नाही आणि लवकर कडक होते.

पोळी जास्त काळ मऊ कशी ठेवायची?

हेही वाचा: बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक

पोळी जास्त वेळ मऊ ठेवायची असेल तर पीठ मळताना त्यात दही घालून मळून घ्या. याशिवाय कोमट पाण्याने पीठ मळून घेतल्यानेही पोळी मऊ राहते. त्यासाठी तुम्हाला फक्त पीठ चाळून घ्यायचे आहे आणि त्यात दोन चमचे दही मिक्स करायचे आहे. नंतर कोमट पाण्याने मळून घ्या, यानंतर पोळी बनवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच आणखी एक कारण म्हणजे तुम्ही पोळीला ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवू शकता, जेणेकरून ती जास्त काळ मऊ राहील. याशिवाय तुम्ही पोळीला बटर पेपर लावून झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता, जेणेकरून ती कडक होणार नाही.