शहीद दिवस भारतात अनेक तारखांना साजरा केला जातो. २३ मार्च हा दिवस या कारणांमुळे स्मरणात आहे, कारण या दिवशी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तीन शूर स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी फाशी दिली. तसेच ३० जानेवारी हा दिवस महात्मा गांधीं यांच्या स्मरणार्थ शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

शहीद दिवस का साजरा केला जातो?

भारतात मुख्यतः या दोन तारखांना शहीद दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता फाशी दिली होती. असे ही सांगितले जाते की फाशीवर जाताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आनंदाने – ”मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला’ हे गाणे गात होते. वयाच्या २३ व्या वर्षी फासावर चढलेले भगतसिंग पुढे देशाचे आदर्श बनले. ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी भारतीयांची स्वातंत्र्याची चळवळ त्यांच्या फाशीने अधिक तीव्र झाली.

शहीद दिवसांचा इतिहास

भगतसिंग यांनी राजगुरू यांच्यासमवेत १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ब्रिटीश अधिकारी जे.जे. पी. सँडर्स यांना मारले. सुखदेव हेदेखील या योजनेत सामील होते. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना या कृतीत मदत केली. याशिवाय ब्रिटिश सरकारला जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी क्रांतिकारक साथीदार बटुकेश्वर दत्त यांच्यासमवेत ८ एप्रिल १९२९ रोजी इंग्रज सरकारला जागं करण्यासाठी बॉम्ब आणि पत्रके फेकली. या घटनेनंतर दोघांना तिथे अटक करण्यात आली होती.

तुरुंगात सुमारे २ वर्षांच्या काळात भगतसिंग क्रांतिकारक कारवायांशीही संबंधित होते , तसेच यात त्यांनी त्यांचे लेखन व अभ्यासही सुरू ठेवला होता. असे म्हणतात की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी २४ मार्चच्या दिवशी निश्चित करण्यात आली होती, परंतु आदल्या दिवशी म्हणजेच २३ मार्चच्या रात्री या तीन क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली .त्यानंतर ही बातमी सर्वत्र आगीसारखी पसरली. जनतेचा संताप आणि निषेध पाहून ब्रिटीश सरकारने फाशी देण्याचा दिवस आणि वेळ बदलली आणि भारताच्या या क्रांतिकारांना एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहीद दिवसाचे महत्त्व

शहीद दिवस दरवर्षी २३ मार्च रोजी भारतातील नागरिकांद्वारे साजरा केला जातो. भारतातील शहीद दिन हा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणाचा दिवस आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या स्मरणार्थ अगदी लहान वयात आपल्या प्राणांची आहुती दिली. शहीद दिवस साजरा करण्यासाठी कोणतीही अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नसली तरीही देशभरातील अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि इतर संस्था शहीद दिवस साजरा करतात. अनेक शाळांमध्ये, शहीद दिन हा वादविवाद आणि निबंध लेखन स्पर्धा म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये देशभक्तीचा विषय असतो.