शरीर म्हटलं की वेदना आल्याचं, आपणाला थोडं खरचटलं तरी वेदना होतात. पण जेव्हा आपण आपली नखं किंवा केस कापत असतो तेव्हा आपणाला वेदना होत नाहीत, असं का होतं याबाबत तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती सांगणार आहोत. अगदी लहान वयापासून आपण केस आणि नखं कापतो. केस कापत असताना आपल्याला कधीच वेदना होत नाहीत. मानवी शरीराच्या विविध अवयवांपैकी नखं आणि केस यामध्ये असं काय वेगळं आहे की, ज्यामुळे आपल्याला वेदना होत नाहीत ते जाणून घेऊया.

…म्हणून नखं, केस कापताना वेदना का होत नाहीत –

हेही वाचा- वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्रॅम हिरवी मिरची खावी? तज्ज्ञांनी सांगितले व फायदे व योग्य पद्धत

नखं आणि केस मृत पेशींनी बनलेले असल्यामुळे त्यांना कापताना आपल्या शरीराला काहीच त्रास होत नाही. त्यांना डेड सेल्स असंही म्हटले जाते . नखे ही आपल्या शरीरातील एक विशेष रचना आहे जी त्वचेपासून जन्माला येते. ते केराटिन नावाच्या पदार्थापासून बनतात. केराटिन हा निर्जीव प्रथिनांचा एक प्रकार आहे. नखाते मुळ हे त्वचेच्या आत असते. नखाखालची त्वचा शरीराच्या इतर भागासारखी असते. पण त्यात लवचिक तंतू असतात. मोठी झालेली नखं कापताना आपल्याला त्रास होत नाही परंतु छोटी नखं जी त्वचेला चिकटलेली असतात ती कापताना मात्र आपल्याला भयंकर वेदना होतात. कारण तिथे जिवंत पेशी असतात.

हेही वाचा- उन्हाळ्यात खूप घाम येतोय? मग अंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता ‘या’ घरगुती गोष्टी आणि दिवसभर राहू शकता फ्रेश

नखे वाढवण्यासाठी उपाय-

आजकाल नखांचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक उपाय केले जातात अनेकांना लांब नखं आवडतात. पूर्वी केवळ गोलाकार स्वरूपात नखांना आकार दिला जायचा. मात्र आता नखांनाही वेगवेगळे आकार आणि नेलआर्टने सजवले जाते. तुम्हांला नखं वाढवायची असतील तर तुम्हांला काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात. नखांना प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही आहारात दही, संत्री, अंडी ह्या गोष्टींचा समावेश करु शकता.