Side Effects Of Drinking Green Tea In Empty Stomach : ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी असते. अशा परिस्थितीत काही लोक सकाळची सुरुवात ग्रीन टी पिऊन करतात. पण, हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तर रिकाम्या पोटी ग्रीन टी पिण्याबद्दल तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. पण, बहुतेक तज्ज्ञ रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळण्याचा सल्ला देतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, का? तर याचे उत्तर आपण बातमीतून जाणून घेऊया…

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे का टाळावे?

ग्रीन टीमध्ये टॅनिन आणि पॉलीफेनॉल असतात, जे रिकाम्या पोटी प्यायल्यास पोटातील आम्ल उत्पादन वाढवू शकतात. यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ, अपचन, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटाच्या नैसर्गिक पचनक्रियेवरही परिणाम होतो; कारण ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन अन्नातून लोहाचे शोषण कमी करू शकतात.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या…

तर तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टी पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणानंतर किंवा हलका नाश्ता केल्यानंतर. सकाळी थोडासा नाश्ता केल्यानंतर ग्रीन टी पिणे बेस्ट ठरेल. यामुळे शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि ऊर्जेची पातळीही वाढते. जेवणानंतर ग्रीन टी पिणे पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया जलद होते, पोटाच्या समस्या दूर करण्यासही मदत होते. तसेच संध्याकाळी जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते, तेव्हा ग्रीन टी नैसर्गिक ऊर्जा बूस्टर म्हणून काम करते. काही लोकांना व्यायामापूर्वी किंवा नंतर ग्रीन टी पिणे आवडते. कारण शरीराची ऊर्जा पातळी सुधारण्यास आणि सहनशक्ती वाढविण्यास ग्रीन टी मदत करू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही किती प्रमाणात ग्रीन टी प्यावी?

तुम्ही दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी पिणे पुरेसे आहे. जास्त ग्रीन टी प्यायल्याने पोट खराब होणे, निद्रानाश आणि यकृतावर दबाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.