हिवाळ्यात अनेकजण ब्लँकेट आणि रजईचा वापर करतात. पण गेल्यावर्षी धुवून ठेवलेले ब्लँकेट पुन्हा वापरण्यापूर्वी धुवून वापरले जातात. पण हे ब्लँकेट, रजई वजनाला जरी हलके वाटत असले तरी पाण्यात भिजवल्यानंतर ते इतके जड होतात की ते स्वच्छ करणे अवघड होऊन जाते. यावेळी बरेच लोक घरी धुण्याऐवजी ड्राय क्लीन करुन घेतात. पण तुम्हाला माहित आहे का, कोणत्याही मेहनतीशिवाय आणि अगदी कमी खर्चात तुम्ही घरच्या घरी ब्लँकेट आणि रजई स्वच्छ करु शकतात. यासाठी तुम्हाला खालील ४ क्लिनिंग टिप्स फॉलो कराव्या लागतील.

बेकिंग सोडा वापरा

ब्लँकेटमधून येणारा उग्र वास आणि ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही स्वयंपाकात वापरत असलेला बेकिंग सोडा वापरू शकता . यासाठी ब्लँकेट किंवा रजाईवर आधी बेकिंग सोडा शिंपडा आणि २० मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर व्हॅक्यूमने ब्लँकेट स्वच्छ करा आणि नंतर तो वापरा.

फॅब्रिक स्प्रे वापरा

तुम्हाला फॅब्रिक फ्रेशनर, फॅब्रिक सॅनिटायझर यांसारख्या अनेक नावांसह फॅब्रिक स्प्रे सहज बाजारात मिळतील. तुम्हाला तुमचे ब्लँकेट कोणत्याही मेहनतीशिवाय स्वच्छ करायचे असल्यास, हा उत्तम पर्याय आहे. यासाठी ब्लँकेट आधी नीट झटकून त्यातील धूळ काढून टाका. त्यानंतर त्यावर फॅब्रिक स्प्रे वापरा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लँकेट उन्हात ठेवा

जड ब्लँकेट स्वच्छ करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवणे. ब्लँकेटवर पातळ लाकडी काठीने मारुनही तुम्ही जड ब्लँकेटमधील धूळ काढू शकता. असे केल्याने ब्लँकेटमधील धुळ तर निघेलच शिवाय सुर्यप्रकाशामुळे त्यातील उग्र वासही निघून जाईल. यामुळे ब्लँकेट पुन्हा एकदा वापरण्यासाठी पूर्णपणे तयार असेल.