World Breastfeeding Week: ‘वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक’ म्हणजेच ‘जागतिक स्तनपान आठवडा’ ही एक मोहिम आहे जो दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. आठवडाभर साजरा केल्या जाणाऱ्या मोहिमेंतर्गत, आई आणि बाळ दोघांसाठी खूप महत्वाचे आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश्य पूर्ण जगाला स्तनपान हे एका बाळासाठी आणि आईसाठी किती आवश्यक आहे याबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेंतर्गत सांगितले जाते की, एका बाळाच्या संपूर्ण विकासासाठी स्तनपान किती आवश्यक आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, दरवर्षी २७ लाख मुलं कुपोषणाला बळी पडतात. ही संख्या मृत बाळांच्या एकूण संख्येपेक्षा खूप जास्त भयानक आहे. बाळासाठी त्याच्या आईचे दुध खूप आवश्यक असते कारण त्यामुळे त्याचा विकास लवकर होतो. डॉक्टरापासून हेल्थ एक्सपर्टपर्यंत सर्वजण नेहमी सांगतात की, ६ महिन्यांच्या बाळाला फक्त आईचे दुध दिले पाहिजे.
काय आहे यावर्षीची थीम?
दरवर्षी जागतिक स्तनपान कॅम्पेन एक खास थीमवर आधरित असते. या वर्षीची थीम स्तनपान करा आणि काम करा, काम करा…(Let’s make breastfeeding and work, work! अशी आहे.
हेही वाचा – Beer Tanning म्हणजे काय आहे? नव्या ट्रेंडला पडू नका बळी, तज्ज्ञांनी दिला इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने नवीन मातांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
- ६ महिन्याच्या बाळाला फक्त आईचे दुध द्यावे. पाणी सुद्धा द्यावे.
- ६ महिन्यांनंतर मुलांना करा घरी तयार केलेल्या पदार्थाची पेज खाऊ घालू शकतात आणि २ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी बाळाला स्तनपान करण्यात आई सक्षम असे तर आवर्जून केले पाहिजे.
हेही वाचा – World Breastfeeding Week :स्तनपान का करावे ? स्तनपानाविषयीच्या सोप्या टीप्स जाणून घ्या…
स्तनपानाचे फायदे आणि नुकसान
- जे मुलं आपल्या आईचे दुध बऱ्याच काळासाठी पितात त्यांची इम्युनिटी खूप चांगली असते. आणि प्रत्येक आजाराचा सामना करु शकतात.
- ज्या माता बाळांना स्तनपान करतात त्यांना मासिक पाळी येण्याची शक्यता कमी असते. अशामध्ये काही काळ मासिक पाळीपासून ब्रेक मिळतो. असे म्हणतात की या काळात ओव्यूलोशन होत नाही.
- बाळाला स्तनपान केल्याने मुधमेह आणि ह्रद्यासंबधीचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
- बाळाचा जन्मानंतर ६ महिने स्तनपान करणे गरजेचे आहे.
- स्तनपान करताना ब्रेस्ट मिल्क पंप करणे काही महिलांना योग्य वाटत नाही.
- काही महिलांना प्रसुतीच्या सुरुवातीच्या आठवड्यात स्तनपान करताना खूप त्रास होतो.
- काही महिलांना स्तनामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.