जगभरातील लोकं उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. ब्लडप्रेशर ही अशी समस्या आहे ज्यामुळे हृदयविकार, शुगर, पायाला सूज येणे, डोळ्यांना सूज येणे इत्यादी समस्या देखील होऊ शकतात. शरीरात लपलेला हा तुमचा सर्वात वाईट शत्रू असू शकतो. WHO च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी २०० दशलक्षाहून अधिक लोकं उच्च रक्तदाबाचे बळी पडत आहेत.

ताणतणाव, कामाचा ताण, अनियंत्रित खाणे आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब वाढतो तेव्हा या स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात. तसेच निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य रक्तदाब पातळी १२०/८०mmHg असते. तथापि, जर रक्तदाब वाचन ९०/६०mmHg पेक्षा कमी असेल तर ते कमी मानले जाते.

तुम्ही जर खूप दिवसांपासून ब्लडप्रेशरची औषधे घेत असाल आणि त्यानंतरही तुम्हाला काही फरक पडत नसेल, तर योगगुरू बाबा रामदेव यांच्यानुसार या योगासनांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांचा अवलंब करून तुम्ही कमी आणि उच्च रक्तदाब दोन्ही नियंत्रित करू शकता.

कमी रक्तदाब बरा करण्यासाठी योगासन

मत्स्यासन

योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, जास्त व्यायाम आणि जास्त घाम येणे यामुळे कधीकधी रक्तदाब कमी होतो. याशिवाय कमी रक्तदाबाची समस्या डिहायड्रेशनमुळेही होऊ शकते. यामुळे हार्ट फेल होऊ शकतो. मत्स्यासन या योगाचा अवलंब केल्याने कमी रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. या आसनात तुम्ही जमिनीवर झोपा, नंतर छातीचा भाग जमिनीवरून उचला, डोके जमिनीवर ठेवा आणि हात जमिनीवर सरळ ठेवा.

पद्म सारंगासन

पद्म सारंगासन हे आसन केल्याने मेंदू आणि थायरॉईड ग्रंथींमध्ये रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे शरीर ताजेतवाने होते. यामध्ये जमिनीवर झोपून प्रथम पाय सरळ वर करा, नंतर गुडघ्यापासून थोडेसे वाकवा आणि हात जमिनीवर सरळ ठेवा.

उच्च रक्तदाब बरा करण्यासाठी योगासने

वज्रासन

हे आसन तुम्ही लंच आणि डिनर नंतर देखील करू शकता. या आसनामुळे रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते. गुडघे वाकवून पायांवर बसून रहा आणि नंतर हात गुडघ्यावर ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिमोत्तनासन

या आसनाचा अवलंब केल्याने शरीरातील चरबी कमी होते, त्यामुळे वजन कमी होते. हे तणाव देखील कमी करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. या आसनात पाय सरळ करा आणि हाताने पाय धरा. हे १० मिनिटे करा.