एखाद्याचा चेहरा वाचून तुम्ही त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. पण तुम्हाला माहीत आहे का की एखाद्याचा चेहरा वाचून तुम्ही त्याच्या नशिबाविषयीही माहिती मिळवू शकता? याबाबत एक संशोधन करण्यात आले असून त्यातून रंजक गोष्टी समोर आल्या आहेत.

न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पुरुष आणि महिलांच्या १७,६०७ पासपोर्ट फोटोंच्या चेहऱ्याची लांबी-रुंदी मोजली. यावरून निष्पन्न झालेल्या परिणामांवरून असे दिसून आले की चौकोनी चेहऱ्याचे लोक अंडाकृती चेहऱ्याच्या लोकांपेक्षा जास्त रागीट आणि आक्रमक असतात आणि ही गोष्ट पुरुषांमध्ये अधिक आढळून आली. याशिवाय चेहऱ्याच्या इतर आकारांबाबतही रंजक गोष्टी समोर आल्या.

Side Effects of eating Onion: गरजेपेक्षा जास्त कांदा खाणे ठरू शकते हानिकारक; जाणून घ्या याचे तोटे

चौकोनी चेहरा :

ज्या लोकांचा चेहरा चौकोनी असतो ते खूप तल्लख, चपळ आणि महत्वाकांक्षी असतात आणि ते आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते बंडखोर रूप देखील घेऊ शकतात. ते सहजपणे इतरांवर आपली छाप पाडू शकतात आणि सहज गोंधळात पडत नाहीत.

त्रिकोणी चेहरा :

ज्या लोकांचा चेहरा त्रिकोणी असतो, ते खूप सर्जनशील असतात. या व्यतिरिक्त हे लोक बुद्धिमान देखील असतात आणि त्याचबरोबर त्यांना लवकर राग येतो. त्रिकोणी चेहरे असलेले लोक सहसा दुबळे असतात.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

अंडाकृती चेहरा :

ज्या लोकांचा चेहरा अंडाकृती असतो ते कलात्मक प्रवृत्तीचे असतात. त्याच वेळी, त्यांचे व्यक्तिमत्व देखील खूप आकर्षक असतात आणि ते लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करतात. पण हे लोक आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असतात आणि लवकर आजारी पडतात. हे लोक मानसिकदृष्ट्याही कमकुवत असतात. मात्र, त्यांच्यात नेतृत्वगुणही आहेत.

गोल चेहरा :

गोल चेहऱ्याचे लोक खूप भावूक असतात आणि ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी सर्वकाही करण्यास तयार असतात. जर तुम्ही खरा जोडीदार शोधत असाल, या व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहेत. याशिवाय गोलाकार चेहरा सौंदर्याच्या बाबतीतही सर्वात सुंदर मानला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)